बलात्कार पीडितेच्या शरीराचे तुकडे करण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:07 AM2021-07-16T04:07:38+5:302021-07-16T04:07:38+5:30

नागपूर : बलात्कार पीडित महिलेला तक्रार परत न घेतल्यास तिच्या शरीराचे चार तुकडे करून चार राज्यात फेकण्याची धमकी दिल्याचे ...

Threatening to dismember the body of a rape victim | बलात्कार पीडितेच्या शरीराचे तुकडे करण्याची धमकी

बलात्कार पीडितेच्या शरीराचे तुकडे करण्याची धमकी

Next

नागपूर : बलात्कार पीडित महिलेला तक्रार परत न घेतल्यास तिच्या शरीराचे चार तुकडे करून चार राज्यात फेकण्याची धमकी दिल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर एका महिन्याने महिलेला धमकी दिल्यामुळे महिला आणि तिचे कुटुंबीय दहशतीत आहेत.

नंदनवन येथील रहिवासी ३२ वर्षीय महिलेचा पती ऑटो डीलर आहे. महिलेचे दुसरे लग्न झाले आहे. आरोपी अनुपची मोबाईल शॉपी आहे. तो महिलेच्या पहिल्या पतीचा मित्र आहे. त्यामुळे तो महिलेला ओळखतो. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार तिने दुसरे लग्न केल्यानंतर अनुप तिच्या घरी येऊ लागला. १२ जूनला पती बाहेरगावी गेल्यानंतर पहाटेच अनुप तिच्या घरी आला. त्याने महिलेवर बलात्कार केला. महिलेने याची तक्रार नंदनवन ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यानंतरही अनुपला अटक केली नाही. त्यामुळे अनुपने न्यायालयापुढे शरणागती पत्करली. गुरुवारी पहाटे अज्ञात आरोपीने महिलेच्या कारची काच फोडून धमकीचे पत्र आत टाकले. पत्रात पोलिसात दिलेली तक्रार परत घे नाहीतर तुझ्या शरीराचे चार तुकडे करून चार राज्यात फेकून देऊ. तुझ्या कुटुंबाला सुद्धा सोडणार नाही, असे लिहिलेले होते. धमकीचे पत्र पाहून महिला आणि तिच्या कुटुंबीयांमध्ये दहशत पसरली आहे. महिलेने नंदनवन ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी धमकी दिल्याचा अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

.....................

Web Title: Threatening to dismember the body of a rape victim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.