पत्रकारास जीवे मारण्याची धमकी

By admin | Published: September 26, 2015 03:02 AM2015-09-26T03:02:34+5:302015-09-26T03:02:34+5:30

कुख्यात तुषार दलाल व त्याच्या साथीदारांनी पत्रकार रविकांत कांबळे यांच्यावर हल्ला करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

Threatening to kill journalists | पत्रकारास जीवे मारण्याची धमकी

पत्रकारास जीवे मारण्याची धमकी

Next

रेस्टॉरंटमध्ये हल्ला : कुख्यात तुषार दलाल विरुद्ध गुन्हा दाखल
नागपूर : कुख्यात तुषार दलाल व त्याच्या साथीदारांनी पत्रकार रविकांत कांबळे यांच्यावर हल्ला करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. हुडकेश्वर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
कुख्यात तुषार दलाल याला सक्करदरा येथील सेव्हन स्टार बारमध्ये झालेल्या खुनाच्या आरोपात जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. दोन महिन्यापूर्वी तो संचित रजेवर सुटून आला होता. तेव्हापासून तो फरार आहे. रविकांत कांबळे हे ‘नागपूर टुडे’ या ई-पोर्टल पेपरमध्ये काम करतात. त्यांनी फरार तुषार दलाल नागपुरात कसा फिरत आहे, यासंदर्भात छायाचित्रासह वृत्त प्रकाशित केले होते. तसेच सक्करदरा येथील खुनाच्या प्रकरणातही त्यांनी पोलिसांना बरेच सहकार्य केले होते. त्यामुळे तुषारच्या मनात रविकांतबद्दल प्रचंड राग होता. रविकांत गुरुवारी रात्री आपल्या मित्रासह हुडकेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील एका बार व रेस्टॉरंटमध्ये भोजन करायला गेले होते. तेव्हा तुषारच्या एका साथीदाराने त्यांना पाहिले. त्याने लगेच फोन करून तुषारला माहिती दिली. तुषार दलाल हा आपल्या साथीदारासह पोहोचला.
तो रविकांतजवळ पोहोचला. माझ्याबाबतच तू का लिहितो, अशी विचारणा करीत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच चाकू काढून मारण्याचा प्रयत्न केला. परंतु रविकांतने आरडाओरड केली. त्यामुळे बारमधील बॉन्सर धावले. त्यांनी तुषारला समज दिली. त्यामुळे तो निघून गेला. रात्री उशिरा हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)

Web Title: Threatening to kill journalists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.