कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी

By admin | Published: September 10, 2015 03:34 AM2015-09-10T03:34:11+5:302015-09-10T03:34:11+5:30

७० लाख रुपये दिल्यानंतरही प्लॉटचे दस्तऐवज व बँकेचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाले नसल्याने श्रीनिवासन हे धोटे यांच्याकडे वारंवार विचारणा करू लागले.

Threats to kill the family | कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी

कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी

Next

डेव्हलपर्सला बंधक बनवून मारहाण
नागपूर : ७० लाख रुपये दिल्यानंतरही प्लॉटचे दस्तऐवज व बँकेचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाले नसल्याने श्रीनिवासन हे धोटे यांच्याकडे वारंवार विचारणा करू लागले. परंतु तो नेहमी काही ना काही कारण सांगून टाळू लागला. ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी श्रीनिवासन यांना पैसे देण्यासाठी धोटेने आपल्या घरी बोलावले. श्रनिवासन यांनी या सौद्यातील दलालाला सोबत नेले. घरी पोहोचल्यावर धोटेने मुंबईतील एक फायनान्सर हॉटेल प्राईडमध्ये थांबला असल्याने सोबत चालण्यास सांगितले. त्याच्या गोष्टीवर विश्वास ठेवून श्रीनिवासन व दलाल धोटेसोबत डस्टर गाडीत बसले. धोटे दोघांनाही घेऊन हॉटेल प्राईडच्या मागे असलेल्या एका बंगल्यात घेऊन गेला. तिथे त्याने व त्याच्या साथीदाराने श्रीनिवासन आणि दलालाला बेदम मारहाण केली. त्यांचे कपडे उतरविले त्यांना रक्तबंबाळ केले. पुन्हा पैसे मागितले किंवा याबाबत कुणाला काही सांगितले तर कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर श्रीनिवासन यांना बळजबरीने दारू पाजली. त्यामुळे त्यांना उलटी होऊ लागली. सातत्याने उलटी होत असल्याने आरोपी त्रस्त झाले. त्यांनी रात्री २.३० वाजता श्रीनिवासन उलटी करण्याच्या बहाण्याने बंगल्याच्या बाहेर आले आणि संधी पाहून पळाले. ते कसेबसे वर्धा रोडपर्यंत पोहोचले. एका मित्राला फोन करून बोलावले आणि त्याच्यासोबत घरी गेले.
या घटनेमुळे श्रीनिवासन खूप दहशतीत होते. त्यांनी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या नातेवाईकाला आपबिती सांगितली. त्यांनी अधिकाऱ्याशी चर्चा केली. त्यांनी धीर दिल्यानंतर श्रीनिवासन तक्रार करायला तयार झाले. मंगळवारी रात्री अंबाझरी पोलीस ठाण्यात पोहोचून त्यांनी तक्रार दाखल केली. (प्रतिनिधी)

Web Title: Threats to kill the family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.