सोशल मीडियावर फोटो शेअर टाकण्याची धमकी, विनयभंग व खंडणीची मागणी

By योगेश पांडे | Published: May 6, 2024 06:33 PM2024-05-06T18:33:29+5:302024-05-06T18:34:54+5:30

Nagpur : लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

Threats to share photos on social media, molestation and demand for ransom | सोशल मीडियावर फोटो शेअर टाकण्याची धमकी, विनयभंग व खंडणीची मागणी

Threats to share photos on social media, molestation and demand for ransom

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
सोशल मीडियावर तरुणीचे फोटो शेअर करण्याची धमकी देत तिचा विनयभंग करण्यात आला तसेच आरोपीने तिच्याकडून दीड लाखांच्या खंडणीचीदेखील मागणी केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

विजयकुमार राकेशकुमार (२५, लकडगंज) असे आरोपीचे नाव आहे. तो मुळचा उत्तरप्रदेशमधील असून त्याची २१ वर्षीय मुलीशी जुनी ओळखी होती. त्यांच्यात प्रेमसंंबंधदेखील होते व एकत्र फोटो काढले होते. तरुणीच्या घरी माहिती झाल्याने तिने त्याच्याशी संपर्क तोडले होते. विजयकुमारने तिला ४ मे रोजी लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोलावून तुला माझ्याशी प्रेमसंबंध ठेवावे लागतील अशी जबरदस्ती केली. तिने नकार दिला असता त्याने तिचा विनयभंग केला. जर प्रेमसंबंध नाही ठेवले तर फोटो सोशल माध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी दिली व दीड लाख रुपये खंडणीची मागणी केली. हादरलेल्या तरुणीने घरच्यांना या प्रकाराची माहिती दिली व लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी विजयकुमारविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

Web Title: Threats to share photos on social media, molestation and demand for ransom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.