गोडाऊन फाेडून किराणा माल पळवला; तीन आराेपी अटकेत, ६.३२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2022 06:10 PM2022-07-06T18:10:51+5:302022-07-06T18:11:32+5:30
या प्रकरणी वाडी पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली हाेती.
वाडी (नागपूर) : चाेरट्यांनी गोडाऊनची भिंत फाेडून किराणा माल चाेरून नेला. या गुन्ह्याची तक्रार दाखल हाेताच वाडी पाेलिसांनी तीन आराेपींना ताब्यात घेऊन अटक केली. त्यांच्याकडून ६ लाख ३२ हजार ६७१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ठाणेदार प्रदीप रायनावर यांनी दिली. ही कारवाई नुकतीच करण्यात आली.
कृष्णा कालिदास कांबळे (२३), जतीन हिरालाल उईके (१८) व रितिक गणेश निबरकर (१९, तिन्ही रा. साईनगर, वाडी) अशी अटकेतील आराेपींची नावे आहेत. खडगाव राेडवरील आशिष प्लाझा येथे साई समर्थ इंटरप्राइजेस गोडाऊन असून, २५ ते २७ जून २०२२ दरम्यान अज्ञात चाेरट्यांनी गोडाऊनची भिंत फाेडून किराणा माल चाेरून नेला हाेता. ही बाब लक्षात आल्यानंतर स्वप्निल अनिल रेगुंडवार (रा. मनीषनगर, नागपूर) यांनी वाडी पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली हाेती.
तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पाेलिसांनी तिन्ही आराेपींना ताब्यात घेत अटक केली. आराेपींनी या गुन्ह्यात वापरलेले टाटा एस वाहन किंमत ५ लाख रुपये तसेच १ लाख ३२ हजार ६७१ रुपये किमतीचा किराणा माल असा एकूण ६ लाख ३२ हजार ६७१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई ठाणेदार प्रदीप रायनावर, पाेलीस निरीक्षक विनाेद गाेडबाेले यांच्या मार्गदर्शनात पाेलीस उपनिरीक्षक गणेश मुंडे, हवालदार तुलसी शुक्ला, अजय पाटील, दुर्गादास माकडे, गाेपाल यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.