गांजाची विक्री-खरेदी करणारे तीघे अटकेत, दोन फरार
By दयानंद पाईकराव | Published: March 30, 2024 04:36 PM2024-03-30T16:36:07+5:302024-03-30T16:36:29+5:30
३.४० लाखांचा मुद्देमाल जप्त : गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकाची कामगिरी.
दयानंद पाईकराव, नागपूर : गांजाची विक्री करणाऱ्या आरोपीला तसेच गांजा खरेदी करणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) अटक करून एकुण ३.४० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अभिषेक देवशंकर वर्मा (२५, रा. येरला, कळमेश्वर), विक्रांत चंद्रकांत टकले (३७, रा. सादिकाबाद कॉलनी, अवस्थीनगर चौक, मानकापूर) आणि अरविंद मधुकर कोडापे (३३, रा. रामनगर तेलंगखेडी अंबाझरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींचे साथीदार पंकज उर्फ बाबु चिनी (रा. मकरधोकडा) आणि दिनेश (रा. रामटेकेनगर) हे घटनास्थळाहून पळून गेले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. शुक्रवारी २९ मार्चला सायंकाळी ६.५५ ते रात्री १०.१० वाजताच्या दरम्यान गुन्हे शाखेचे एनडीपीएस पथक गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारांच्या शोधात गस्त घालत होते.
दरम्यान त्यांना एक व्यक्ती गांजा विकण्यासाठी नविन काटोल नाका चौकात येत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तेथे धाड टाकून १ लाख ३५ हजा ६०० रुपये किमतीचा ६ किलो ७८० ग्रॅम गांजा जप्त केला. आरोपीच्या ताब्यातून तीन अॅक्टीव्हा, एक मोबाईल असा एकुण ३ लाख ४० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरुद्ध कलम ८ (क), २ (ब), २९ एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून त्यांना गिट्टीखदान पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.