जनावरे चाेरणारे तिघे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:08 AM2021-09-03T04:08:57+5:302021-09-03T04:08:57+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क पारशिवनी : शेतातील गाेठ्यातून जनावरे चाेरून नेणाऱ्या तीन चाेरट्यांना पकडण्यात पारशिवनी पाेलिसांना यश आले. त्यांच्याकडून १५ ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी : शेतातील गाेठ्यातून जनावरे चाेरून नेणाऱ्या तीन चाेरट्यांना पकडण्यात पारशिवनी पाेलिसांना यश आले. त्यांच्याकडून १५ हजार रुपये किमतीची बैलजाेडी हस्तगत करण्यात आली. ही कारवाई बुधवारी (दि.१) करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये यशवंत ऊर्फ छाेटू शेरसिंग मरसकाेल्हे (२६, रा. नयाकुंड, ता. पारशिवनी), भागवत रामप्रसाद मलिया (४०, रा. मनसर, ता. रामटेक) व शुभम सुखदेव मेश्राम (२६, रा. नयाकुंड, ता. पारशिवनी) यांचा समावेश आहे. २८ ऑगस्ट राेजी नयाकुंड येथील शेतकरी सूरजसिंग निंबाेने यांच्या शेतातील गाेठ्यातून चाेरट्यांनी बैलजाेडी चाेरून नेली. शेतकरी निंबाेने यांच्या तक्रारीवरून अज्ञात आराेपीविरुद्ध गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला हाेता. तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे जनावरे चाेरीच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या तिन्ही आराेपींना ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून १५ हजार रुपये किमतीचे बैल जप्त करण्यात आले. आराेपींकडून गुरे चाेरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पाेलीस निरीक्षक हृदयनारायण यादव यांनी सांगितले.
याप्रकरणी पारशिवनी पाेलिसांनी आराेपींविरुद्ध गुन्हा नाेंदविला असून, तिघांना अटक केली आहे. ही कारवाई पाेलीस निरीक्षक हृदयनारायण यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संदीपान उबाळे, मुदस्सर जमाल, संदीप कडू, महेंद्र जळीतकर यांच्या पथकाने केली.
020921\20210902_145108.jpg
अटक