तिघांनी मारहाण करीत एकास लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:10 AM2021-09-21T04:10:10+5:302021-09-21T04:10:10+5:30

कुही : वडद शिवारातील नाल्याकाठी बसलेल्या एकास तिघांनी दगडाने मारहाण करून जखमी केले आणि त्याच्याकडील ३८ हजार २०० रुपयांचा ...

The three beat and robbed one | तिघांनी मारहाण करीत एकास लुटले

तिघांनी मारहाण करीत एकास लुटले

googlenewsNext

कुही : वडद शिवारातील नाल्याकाठी बसलेल्या एकास तिघांनी दगडाने मारहाण करून जखमी केले आणि त्याच्याकडील ३८ हजार २०० रुपयांचा ऐवज हिसकावून घेत पळ काढला. ही घटना कुही पाेलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी (दि. १८) सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घडली.

राजेंद्र नामदेव सातपुते (४०, रा. इंगाेलेनगर, हुडकेश्वर राेड, नागपूर) हे त्यांच्या चुलत मामा प्रकाश बाेडखे यांच्यासाेबत वडद शिवारातील नाल्याच्या काठी असलेल्या झाडाखाली दारू पित बसले हाेते. त्यातच तीन अनाेळखी तरुण त्यांच्याजवळ आले आणि त्या तिघांनी राजेंद्र सातपुते यांना धक्काबुक्की करीत दगडाने मारहाण केली. त्यात ते जखमी झाले असून, तिघांनीही राजेंद्र सातपुते त्यांच्याकडून २० हजार रुपयांचा माेबाईल फाेन व ४,७०० रुपये राेख तसेच प्रकाश बाेडखे यांच्याकडील १० हजार रुपयांचा माेबाईल फाेन व ३,५०० रुपये राेख असा एकूण ३८ हजार २०० रुपयांचा ऐवज हिसकावून घेत पळ काढला. याप्रकरणी कुही पाेलिसांनी अज्ञात आराेपींविरुद्ध भादंवि ३९४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस निरीक्षक चंद्रकांत मदने करीत आहेत.

Web Title: The three beat and robbed one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.