तीन दिवसात डिझेल ९५ पैसे, पेट्रोल ८७ पैशांनी महाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:09 AM2021-02-12T04:09:17+5:302021-02-12T04:09:17+5:30
या क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणाले, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत ६१ डॉलर प्रतिबॅरल या कमी स्तरावर आहे. त्यानुसार नागपुरात पेट्रोलचा ...
या क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणाले, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत ६१ डॉलर प्रतिबॅरल या कमी स्तरावर आहे. त्यानुसार नागपुरात पेट्रोलचा दर ३१.५० रुपये प्रतिलीटर होतो. पण केंद्र आणि राज्य शासनाचे विविध कर आणि सेसमुळे पेट्रोलचे दर ९५ रुपयांवर गेले आहेत. हीच स्थिती डिझेलची आहे. २०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत १०५ डॉलर प्रतिबॅरल असतानाही पेट्रोल आणि डिझेलचे भाव सध्याच्या तुलनेत कमी होते. नागपुरात शासनाकडून आयआरडीपीसी सेसच्या माध्यमातून एमएसआरडीसीला संबंधित संपूर्ण रक्कम २०१९ मध्येच मिळाली आहे. त्यानंतरही आयआरडीपीसी नागपुरातून यावर सेस वसूल करीत आहे. हा सेस पेट्रोलवर एक टक्के आणि डिझेलवर तीन टक्के दराने घेण्यात येत आहे. त्यातच नागपुरात पेट्रोल आणि डिझेल दरदिवशी महाग होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य आणि वाहतूकदारांचे जगणे कठीण झाले आहे.
पेट्रोल, डिझेलचे प्रतिलीटर रुपये दर
तारीखपेट्रोल डिझल
७ फेब्रु. ९३.९८ ८४.५३
८ फेब्रु. ९३.९८ ८४.५३
९ फेब्रु. ९४.३२ ८४.९०
१० फेब्रु. ९४.६१ ८५.१६
११ फेब्रु. ९४.८५ ८५.४८