खंडाळा शिवारात भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, सहा गंभीर; मृतांमध्ये चिमुकल्यासह मुलीचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 12:32 PM2023-07-10T12:32:33+5:302023-07-10T12:33:37+5:30

सुसाट कार उभ्या ट्रकवर धडकली

Three dead, six seriously injured in horrific accident in khandala shivara of Nagpur | खंडाळा शिवारात भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, सहा गंभीर; मृतांमध्ये चिमुकल्यासह मुलीचा समावेश

खंडाळा शिवारात भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, सहा गंभीर; मृतांमध्ये चिमुकल्यासह मुलीचा समावेश

googlenewsNext

नागपूर/माैदा : रामटेक शहरानजीकच्या गडमंदिरातून दर्शन आटाेपल्यानंतर भेंडारकर व बाेंदरे कुटुंबीय कारने परतीच्या प्रवासाला निघाले. वाटेत वेगात असलेल्या चालकाचा ताबा सुटला आणि सुसाट कार राेडलगत उभ्या असलेल्या ट्रकच्या मागच्या भागावर धडकली. यात कारमधील चिमुकल्यासह मुलगी व वृद्धाचा मृत्यू झाला असून, दाेन कुटुंबांतील सहाजण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये दाेन लहान मुलींचा समावेश आहे. ही घटना अराेली (ता. माैदा) पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील रामटेक-भंडारा मार्गावरील खंडाळा शिवारात रविवारी (दि. ९) दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास घडली.

परसराम लहानू भेंडारकर (वय ७०), त्यांचा नातू हिमांशू राजेश भेंडारकर (८ महिने) व भार्गवी चंद्रहास बोंदरे (८) अशी मृतांची नावे असून, जखमींमध्ये पत्नी सीताबाई परसराम भेंडारकर (६४), मुलगा तथा कारचालक राजेश परसराम भेंडारकर (३४), सून दुर्गा राजेश भेंडारकर (३२), नात उन्नती राजेश भेंडारकर (५), मेघा चंद्रहास बोंदरे (३१), भाव्या चंद्रहास बोंदरे (८), सर्व रा. सोनकापाळसगाव, ता. साकोली, जिल्हा भंडारा यांचा समावेश आहे.

भेंडारकर व बाेंदरे यांची काैटुंबिक मैत्री असून, दाेन्ही कुटुंबातील एकूण नऊजण रामटेक परिसरात रविवारी सकाळी फिरायला आले हाेते. त्यांनी गडमंदिरात श्रीराम व सीतामाईचे दर्शन घेतल्यानंतर एमएच-३६/एच-८४०३ क्रमांकाच्या कारने परतीचा प्रवास सुरू केला. ते खंडाळा शिवारात पाेहाेचताच चालकाचा ताबा सुटला आणि वेगात असलेली कार राेडलगत उभ्या आलेल्या एमएच-४०/सीडी-९८०२ क्रमांकाच्या ट्रकवर मागून आदळली.

यात परसराम यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर अन्य आठजण गंभीर जखमी झाले. ठाणेदार निशांत फुलेकर यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठून मदतकार्य सुरू केले. परसराम यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी, तर जखमींना उपचारासाठी रामटेक शहरातील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. तिथे सर्व जखमींवर प्रथमाेपचार करून नागपूरला उपचारासाठी पाठविण्यात आले. हिमांशू व भार्गवी या दाेघांचा नागपूर शहरातील हाॅस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती पाेलिस उपनिरीक्षक किशाेर चव्हाण यांनी दिली. याप्रकरणी अराेली पाेलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध भादंवि २८३, ३३७, ३३८, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

सुरक्षात्मक उपाययाेजनांना फाटा

एमएच-४०/सीडी-९८०२ क्रमांकाच्या ट्रकचालकाने ट्रक खंडाळा शिवारात राेडलगत उभा केला हाेता. परंतु, ट्रकभाेवती त्रिकाेणी चिन्हे लावणे, दगड लावणे अथवा झाडांच्या फांद्या लावणे किंवा ट्रकचे इंडिकेटर सुरू करणे यापैकी काेणत्याही सुरक्षात्मक उपाययाेजना केल्या नव्हत्या, अशी माहिती ठाणेदार निशांत फुलेकर यांनी दिली. हा ट्रक पार्सल घेऊन जात हाेता.

Web Title: Three dead, six seriously injured in horrific accident in khandala shivara of Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.