अस्थी विसर्जनाला गेलेले तिघे बुडाले : खापरखेडा परिसरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 09:00 PM2020-09-19T21:00:38+5:302020-09-19T21:04:29+5:30

आजीच्या अस्थीे विसर्जन झाल्यानंतर एक जण अंघोळीसाठी डोहात उरतला. तो बुडत असल्याचे लक्षात येताच त्याचे दोन मित्र मदतीला धावले. मात्र, पोहता येत नसल्याने तिघेही बुडाले.

Three drowned: Incidents in Khaparkheda area | अस्थी विसर्जनाला गेलेले तिघे बुडाले : खापरखेडा परिसरातील घटना

अस्थी विसर्जनाला गेलेले तिघे बुडाले : खापरखेडा परिसरातील घटना

Next
ठळक मुद्देकिल्ले कोलारच्या डोहात दोघांचा बुडून मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर(खापरखेडा) : आजीच्या अस्थीे विसर्जन झाल्यानंतर एक जण अंघोळीसाठी डोहात उरतला. तो बुडत असल्याचे लक्षात येताच त्याचे दोन मित्र मदतीला धावले. मात्र, पोहता येत नसल्याने तिघेही बुडाले. तिघांपैकी दोघांचे मृतदेह शोधून काढण्यात बचाव पथकाला यश आले असून, एकाचा थांगपत्ता लागला नाही. तिघेही नागपूर शहरातील रहिवासी आहेत. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किल्ले कोलार येथील कोलार नदीच्या डोहात शनिवारी (दि. १९) दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.


आकाश राजेंद्र राऊत (२०) व शंतनू ऊर्फ नयन कैलास येडकर (२०) दोघेही रा. रा. रामेश्वरी, नागपूर अशी मृतांची नावे असून, हर्षित राजू येदवान (२०, रा. रामेश्वरी, नागपूर) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. तिघेही मित्र होत. लहानूबाई सदाशिव सरवरे, रा. रामेश्वरी, नागपूर यांचे निधन झाल्याने त्यांचे कुटुंबीय शनिवारी दुपारी रक्षा विसर्जनासाठी किल्ले कोलार येथे आले होते. यात मनिषा भास्कर जाधव, बंडू सदाशिव सरवरे, शोभा बंडू सरवरे, सुमित बंडू सरवरे, शिवानी बंडू सरवरे, राकेश यादव, कपिल पाल, शुभम रामटेके, प्रणय बोरकर, शंतनू ऊर्फ नयन कैलास येडकर, हर्षित राजू येदवान व आकाश राजेंद्र राऊत या १२ जणांचा समावेश होता.
अस्थी व रक्षा विसर्जन झाल्यानंतर शंतनू कोलार नदीच्या डोहात अंघोळ करण्यासाठी उतरला. गढूळ व शेवाळयुक्त पाणी नाकात गेल्याने त्याला गुदमरल्यागत झाले. तो कसातरी करत असल्याचे लक्षात येताच हर्षित व आकाश त्याच्या मदतीला गेले. त्यांनी शंतनूला वाचविण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात शंतनूसोबत दोघेही बुडाले. त्यामुळे इतरांनी या प्रकाराची माहिती लगेच पोलिसांना दिली. फायर अ‍ॅण्ड रेस्क्यू, एसडीआरएफ व आरपीसीच्या बचाव पथकांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
या बचाव पथकांना अंधार होईपर्यंत आकाश व शंतनूचा मृतदेह शोधून काढण्यात यश आले. हर्षित मात्र गवसला नाही. अंधारामुळे शोधकार्य थांबविण्यात आले होते. ते रविवारी (दि. २०) सकाळी पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

Web Title: Three drowned: Incidents in Khaparkheda area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.