वीज काेसळून तीन बकऱ्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:10 AM2021-09-24T04:10:31+5:302021-09-24T04:10:31+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क मेंढला : जाेरात कडाडलेली वीज चारा खात असलेल्या बकऱ्यांवर काेसळली. त्यात तीन बकऱ्यांचा घटनास्थळीच हाेरपळून मृत्यू ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
मेंढला : जाेरात कडाडलेली वीज चारा खात असलेल्या बकऱ्यांवर काेसळली. त्यात तीन बकऱ्यांचा घटनास्थळीच हाेरपळून मृत्यू झाला. सुदैवाने जवळच उभा असलेला गुराखी थाेडक्यात बचावला. ही घटना मेंढला (ता. नरखेड) शिवारात गुरुवारी (दि. २३) दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.
शेषराव डाेमाजी चचाणे, रा. मेंढला, ता. नरखेड हे शेळीपालनाचा व्यवसाय करीत असून, विलास ऊर्फ मुका सातपुते, रा. मेंढला ही त्यांच्या बकऱ्या घेऊन गावालगतच्या जंगलात चारायला गेला हाेता. तलावाच्या परिसरात बकऱ्या चारा खात असताना मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे विलासने झाडाखाली आश्रय घेतला. त्यात जाेरात कडाडलेली वीज बकऱ्यांवर काेसळल्याने तीन बकऱ्यांचा घटनास्थळीच हाेरपळून मृत्यू झाला.
या घटनेत ३० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती शेषराव चचाणे यांनी दिली. या घटनेचा शुक्रवारी (दि. २४) सकाळी पंचनामा करण्यात येणार असल्याची माहिती तलाठी माेटघरे यांनी दिली. शेषराव चचाणे यांची हलाखीची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता शासनाने त्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.