बळीराजासाठी तीन तास जमिनीत
By Admin | Published: February 8, 2016 03:03 AM2016-02-08T03:03:19+5:302016-02-08T03:03:19+5:30
राज्यकर्त्यांचे लक्ष वेधण्यासाठी प्रसिद्ध परफॉर्मर्स आर्टिस्ट श्वेता भट्टड यांनी स्वत:ला तीन तास जमिनीत पुरून घेत शेतकऱ्यांच्या व्यथांकडे लक्ष वेधले.
बळीराजा संकटात आहे. शेतमालाला भाव नाही. सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यापूर्वी शेतकऱ्यांना स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार बळ मिळावे, या मागणीसाठी रविवारी जनमंचच्या वतीने डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहात गैरराजकीय शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीसंदर्भात मौन बाळगून असलेल्या राज्यकर्त्यांचे लक्ष वेधण्यासाठी प्रसिद्ध परफॉर्मर्स आर्टिस्ट श्वेता भट्टड यांनी स्वत:ला तीन तास जमिनीत पुरून घेत शेतकऱ्यांच्या व्यथांकडे लक्ष वेधले.