क्वॉलिसच्या धडकेत तिघे जखमी

By Admin | Published: October 25, 2014 02:38 AM2014-10-25T02:38:03+5:302014-10-25T02:38:03+5:30

सुसाट क्वॉलिसने रोडच्या कडेला असलेल्या पानटपरी, खांब व तवेराला एका पाठोपाठ एक धडक दिली.

Three injured in quill | क्वॉलिसच्या धडकेत तिघे जखमी

क्वॉलिसच्या धडकेत तिघे जखमी

googlenewsNext

मौदा : सुसाट क्वॉलिसने रोडच्या कडेला असलेल्या पानटपरी, खांब व तवेराला एका पाठोपाठ एक धडक दिली. यात तिघे गंभीर जखमी झाले. पाच जण थोडक्यात बचावले. अप्रशिक्षित चालकामुळे हा प्रकार घडल्याचे काहींनी सांगितले. ही घटना मौदा शहरातील गरदेव मोहल्ल्यात शुक्रवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली.
सुरेश सोनकुसरे (४०), भिवाजी तळेकार (४५) व हिरा राजेंद्र मानकर सर्व रा. गरदेव मोहल्ला, मौदा अशी जखमींची नावे आहेत. नामदेव लांजेवार रा. पारडी व राहुल गोपिचंद मस्के रा. मौदा हे दोघेही एमएच-३१/बीडी-२३३३ क्रमांकाच्या क्वॉलिसने आले आणि गरदेव मोहल्ल्यात थांबले. मागून मेटॅडोर आल्याने नामदेवने राहुलला चावी दिली आणि क्वॉलिस बाजूला करण्यात सांगितले. वास्तवात त्याला चारचाकी वाहन चालविता येत नव्हते. त्याने क्वॉलिस सुरू करताच ती रोडच्या कडेला उभ्या असलेल्या नामदेव व इतर दोघांच्या दिशेने येत असल्याचे लक्षात येताच ते दोघेही बाजूला झाल्याने बचावले.
दरम्यान, क्वॉलिसने पानटपरीला धडक दिली. यात भिवाजीचा पाय फ्रॅक्चर झाला असून, सुरेशही जखमी झाला. पानटपरीचालक शिवराज लिमजे थोडक्यात बचावला. पुढे या क्वॉलिसने आंगणात चूल पेटवत असलेल्या हिरा मानकर हिला धडक दिला.
त्यानंतर एमएच-४०/ए-७६६६ क्रमांकाच्या तवेराला जोरदार धडक दिली. हिरा मानकर हिच्यावर नागपूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये व सुरेश सोनकुसरे मेयो रुग्णालयात तसेच भिवाजी तळेकार याच्यावर स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.
संतप्त जमावाने चालकास पकडून चांगलाच चोप दिला. त्याच्यासोबत असलेली मंडळी पळून गेली होती. माहिती मिळताच मौदा पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले. त्यांनी चालकालला ताब्यात घेतले व जखमींना उपचारार्थ रुग्णालयात हलविण्याची व्यवस्था केली. याप्रकरणी मौदा पोलिसांनी भादंवि २७९, ३३७, ३३८, सहलकम १८४ अन्वये गुन्हा नोंदविला. पुढील तपास मौदा पोलीस करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Three injured in quill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.