कुख्यात गंभीऱ्याच्या खुनातून तिघे निर्दोष

By admin | Published: May 1, 2016 03:02 AM2016-05-01T03:02:41+5:302016-05-01T03:02:41+5:30

वाडीच्या रमाबाई आंबेडकरनगर येथील कुख्यात गुन्हेगार सूरज ऊर्फ गंभीऱ्या रुपचंद डोंगरे याचे अपहरण करून खून

Three innocent innocent murders | कुख्यात गंभीऱ्याच्या खुनातून तिघे निर्दोष

कुख्यात गंभीऱ्याच्या खुनातून तिघे निर्दोष

Next

सत्र न्यायालय : अपहरण करून केला होता खून
नागपूर : वाडीच्या रमाबाई आंबेडकरनगर येथील कुख्यात गुन्हेगार सूरज ऊर्फ गंभीऱ्या रुपचंद डोंगरे याचे अपहरण करून खून केल्याच्या आरोपातून तदर्थ न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. डी. खोचे यांच्या न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी संशयाचा लाभ देऊन तीन आरोपींची निर्दोष सुटका केली.
मयूर ऊर्फ एनडी कृष्णा राऊत (२२), धनानंद कृष्णा राऊत (२२) दोन्ही रा. भिवसेनखोरी आणि रितेश ऊर्फ गब्बू महेश गुप्ता (२१)रा. वडधामना, अशी आरोपींची नावे आहेत.
या खटल्यात आरोपींच्यावतीने अ‍ॅड. गजानन काळे ,अ‍ॅड. संदीप बावनगडे यांनी तर सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील वर्षा आगलावे यांनी काम पाहिले.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी, २ मार्च २०१३ रोजी गंभीऱ्या डोंगरे याने मयूरला जबर मारहाण केली होती. या प्रकरणात गंभीऱ्याला वाडी पोलिसांनी अटक केली होती. काही दिवसानंतर तो जामिनावर सुटून आला होता. मयूरने गंभीऱ्याचा गेम करण्याची योजना आखली होती. त्याच्या घरी जाऊन अंबाझरी भागातील मोठ्या चोरीचे आमिष दाखवून त्याला सोबत नेले होते. मयूर आणि साथीदारांनी त्याला दगडाने आणि हातबुक्क्यांनी मारून अंबाझरी तलावात बुडवले होते. त्यानंतर त्याला अंबाझरीच्याच झुडपात फेकून दिले होते. त्याचा मृतदेह २ मे २०१३ रोजी कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. वाडी पोलिसांनी आरोपींना अटक केली होती.

Web Title: Three innocent innocent murders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.