नागपुरात आॅईल टॅँकमध्ये पडल्याने तीन मजूर बेशुद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 09:43 PM2018-03-26T21:43:13+5:302018-03-26T21:43:48+5:30

कामठी रोडवरील एनर्जी अ‍ॅण्ड केमिकल कंपनीच्या अंडरग्राऊंड आॅइल टँकची सफाई करतांना तीन मजूर टंकीमध्ये पडल्याने जखमी होऊन बेशुद्ध झाले. टँकमधील केमिकल गॅसमुळे ते मजूर बेशुद्ध झाल्याची शक्यता आहे. ही घटना सोमवारी दुपारी १२ वाजता कामठी राडवरील गोवर्धन एनर्जी अ‍ॅण्ड पेट्रोल केमिकल्स भीलगाव लि. कंपनीत घडली.

Three labourers unconscious due to falling in oil tank in Nagpur |  नागपुरात आॅईल टॅँकमध्ये पडल्याने तीन मजूर बेशुद्ध

 नागपुरात आॅईल टॅँकमध्ये पडल्याने तीन मजूर बेशुद्ध

googlenewsNext
ठळक मुद्देदोघांची प्रकृती गंभीर : सफाई करतांना घडला अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कामठी रोडवरील एनर्जी अ‍ॅण्ड केमिकल कंपनीच्या अंडरग्राऊंड आॅइल टँकची सफाई करतांना तीन मजूर टंकीमध्ये पडल्याने जखमी होऊन बेशुद्ध झाले. टँकमधील केमिकल गॅसमुळे ते मजूर बेशुद्ध झाल्याची शक्यता आहे. ही घटना सोमवारी दुपारी १२ वाजता कामठी राडवरील गोवर्धन एनर्जी अ‍ॅण्ड पेट्रोल केमिकल्स भीलगाव लि. कंपनीत घडली.
राजू डरिया (३५), कृष्णकुमार (३०) आणि चोरकू उर्फ छोटू अशी जखमी मजुरांची नावे आहे. तिघेही मजूर सफाई करीत होते. खूप वेळ होऊनही ते टँकबाहेर न आल्याने कंपनीच्या इतर कर्मचाऱ्यांनी अग्नीशमन दलाला सूचित केले. अग्नीशमन दलाच्या जवानांनी तिन्ही मजूरांना गंभीर अवस्थेत बाहेर काढले. राजू व कृष्णकुमारला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. चोरकूला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती नाजूक असल्याचे सांगितले जात आहे.
सूत्रानुसार ही कंपनी नीलेश महाजन, राहुल आगोजी, आणि कपिल चांडक हे पार्टनरशिपमध्ये चालवतात. कंपनी परिसरात जमीनीच्या आत आॅईलची १० हजार लीटरची टँक आहे. यात आॅइल टाकण्यासाठी एक गोलाकार झाकन झाले. ठेकेदार प्रकाश लिल्लारे यांना कंपनी आणि टँकच्या सफाईचे काम देण्यात आले होते. सोमवारी सफाई करण्यासाठी टँकला ९० टक्के खाली करण्यात आले होते. दुपारी १२ वाजता टँकचे झाकन उघडण्यात आले. सर्वप्रथम चोरकू उर्फ छोटू टँकमध्ये उतरला. काही वेळानंतर आवाज देऊनही तो बाहेर आला नाही म्हणून त्याला आवाज देत राजू टँकमध्ये उतरला. त्यालाही आवाज दिल्यावर प्रतिसाद न मिळाल्याने कृष्णकुमारही टँकमध्ये उतरा. टँक काही दिवसांपासून बंद असल्यामुळे टँकमध्ये गॅस तयार झाली. त्यामुळे तिघेही बेशुद्ध झाले असावे, असे सांगितले जाते.
पायात दोरीचा फास अडकवून बाहेर काढले
अग्नीशमन अधिकारी एस.बी. रामगुनावार यांच्यानुसार टँकमध्ये तिघेही बेशुद्ध होऊन पडल्याने आत विषारी गॅस असल्याची शक्यता होती. त्यामुळे आत उतरून मजुरांना बाहेर काढणे धोक्याचे होते. अशा वेळी दोरीचा फास तयार केला व तो मजुरांच्या पायात अडकवून त्यांना हळू-हळू बाहेर काढण्यात आले. 

 

Web Title: Three labourers unconscious due to falling in oil tank in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.