जुन्या नाण्यांद्वारे साकारली तीन लाेक रचना ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:07 AM2021-04-25T04:07:06+5:302021-04-25T04:07:06+5:30
भगवान महावीर जयंती विशेष नागपूर : जगाला सत्य, अहिंसा व त्यागाचा संदेश देणारे जैन धर्मातील २४ वे तीर्थंकर भगवान ...
भगवान महावीर जयंती विशेष
नागपूर : जगाला सत्य, अहिंसा व त्यागाचा संदेश देणारे जैन धर्मातील २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती आज देशभरात भक्तिभावाने साजरी केली जात आहे. सार्वजनिक उत्सवावर निर्बंध असल्याने जैन अनुयायांद्वारे घराेघरी साधेपणाने जयंती उत्सवाचे आयाेजन करण्यात आले आहे. जयंतीचे औचित्य साधून जुने नाणी संग्राहक सुरेखा अशाेक काळे यांनी जुन्या नाण्यांच्या मदतीने जैन मान्यतेतील श्रद्धेचे प्रतीक असलेली तीन लाेक रचनेची प्रतिकृती साकारली आहे.
सुरेखा काळे यांना बालपणापासूनच जुनी नाणी जमा करण्याचा छंद असून, गेल्या ४०-४५ वर्षांपासून ताे जाेपासला आहे. त्यांच्याकडे भारतात कधी तरी चलनात असलेल्या असंख्य दुर्मिळ नाण्यांचा संग्रह आहे. जैन धर्मातील प्रतीकांबद्दल त्यांच्या मनात नितांत आदर आहे. भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त आपल्या छंदातून काही तरी बनवावे, अशी भावना त्यांच्या मनात हाेती. त्यांनी तीन लाेक रचनेचे प्रतीक साकारण्याचा विचार केला. जैन धर्माच्या मान्यतेनुसार ब्रह्मांडाची रचना उर्ध्व लाेक, मध्ये लाेक व अधाे लाेक अशा तीन भागात विभागली असल्याचे अनादि काळापासून मानले जाते. या प्रतीकाला आदराचे स्थान आहे. त्यांनी दिल्लीजवळ बडागाव येथे असलेले तीन लाेक रचनेची विशाल प्रतिकृती पाहून ती साकारली आहे. सुरेखा काळे यांनी संग्रहातील २७६ नाण्यांचा वापर करून अतिशय कल्पकतेने हे प्रतीक साकारले आहे. यामध्ये ५, १०, २०, २५ व ५० पैशाच्या जुन्या नाण्यांसह ५ रुपयाच्या नाण्यांचा वापर केला आहे. यात तीन लाेक रचनेचे प्रतीक असलेल्या नाण्यांचा समावेश आहे. हे प्रतीक माेठ्या आकारात तयार करून घरी फ्रेम केले. आता हे प्रतीक येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.