केबल व्यावसायिकाचे तीन लाख लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:07 AM2021-06-02T04:07:38+5:302021-06-02T04:07:38+5:30

ऑनलाइन चीटिंग : एमआयडीसीत गुन्हा दाखल लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्टेट बँकेतून बोलतो, अशी थाप मारून एका भामट्याने ...

Three lakh lamps of cable trader | केबल व्यावसायिकाचे तीन लाख लंपास

केबल व्यावसायिकाचे तीन लाख लंपास

Next

ऑनलाइन चीटिंग : एमआयडीसीत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : स्टेट बँकेतून बोलतो, अशी थाप मारून एका भामट्याने केबल व्यावसायिकाचे तीन लाख रुपये ऑनलाइन लंपास केले. ६ फेब्रुवारीला घडलेल्या या फसवणूक प्रकरणात सोमवारी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

हिंगणा मार्गावरील जिल्हा परिषद शाळेजवळ राजगृहनगर आहे. येथे आनंद अरविंद मिश्रा राहतात. त्यांचा केबल नेटवर्कचा व्यवसाय आहे. त्यांना ६ फेब्रुवारीच्या दुपारी ४ च्या सुमारास फोन आला. मी स्टेट बँकेतून बोलतो, असे सांगून सायबर गुन्हेगाराने आपले नाव रविकुमार शर्मा सांगितले. तुमच्या बँक खात्यातून एक लाख, ७५ हजार रुपयांचा चेक पास झाला. तुम्हाला ती रक्कम परत हवी असेल तर पाठविलेल्या लिंकवर आपली माहिती पाठवा, असे त्याने सांगितले. त्यानुसार मिश्रा यांनी ती लिंक ओपन करून त्यात आपली माहिती पाठवली. त्यानंतर आरोपीने ओटीपी नंबर विचारला. तो सांगितल्यानंतर मिश्रा यांच्या बँक खात्यातून कथित आरोपी शर्माने तीन लाख रुपये काढून घेतले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मिश्रा यांनी सायबर शाखेत धाव घेतली. सायबर पोलिसांनी तातडीने हालचाल करून संबंधित आरोपीचे खाते फ्रीज करण्याचे प्रयत्न केले. मात्र तत्पूर्वीच आरोपीने दोन लाख रुपये काढून घेतले होते. सायबर शाखेने सोमवारी हे प्रकरण एमआयडीसी ठाण्यात पाठवले. त्यावरून पोलिसांनी माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम ६६ नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

---

नाव शर्मा, खाते रहमानचे

आरोपीने मिश्रा यांना आपले नाव शर्मा सांगितले होते. रक्कम मात्र त्याने रहमान गुल्लू गौर याच्या खात्यात वळती केल्याचे प्राथमिक तपासात उघड आले आहे. पोलीस ती रक्कम परत मिळविण्याचे प्रयत्न करीत आहेत.

---

Web Title: Three lakh lamps of cable trader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.