नागपूरमध्ये प्रवाशाला लुटणाऱ्या तीन विधीसंघर्षग्रस्त बालकांना घेतले ताब्यात

By दयानंद पाईकराव | Published: May 28, 2023 03:18 PM2023-05-28T15:18:27+5:302023-05-28T15:18:50+5:30

पोलिसांनी तांत्रिक तपास करून ऑटोच्या क्रमांकावरून रामबाग परिसरात राहणाऱ्या तीन विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले.

Three legal conflict children who robbed a passenger were taken into custody in nagpur | नागपूरमध्ये प्रवाशाला लुटणाऱ्या तीन विधीसंघर्षग्रस्त बालकांना घेतले ताब्यात

नागपूरमध्ये प्रवाशाला लुटणाऱ्या तीन विधीसंघर्षग्रस्त बालकांना घेतले ताब्यात

googlenewsNext

नागपूर : बेद्यनाथ चौकातील ट्रॅव्हल्स कार्यालयासमोर बाहेरगावावरून आलेल्या एका प्रवाशाचा १५७५० रुपयांचा मुद्देमाल चोरी करणाऱ्या तीन विधीसंघर्षग्रस्त बालकांना इमामवाडा पोलिसांनी १२ तासात ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त केला आहे.

विठ्ठल प्रमेश्वर (वय ३०, रा. ढेकन मोहा, जि. बीड) हे शनिवारी पहाटे ४.१० वाजता बसने नागपूरला आले. ते बेद्यनाथ चौकातील कमला ट्रॅव्हल्स ऑफिससमोर थांबले होते. तेवढ्यात ऑटोतून आलेल्या तीघांनी त्यांना हाताबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या जवळील मोबाईल व खिशातील ७५० रुपये असा एकुण १५७५० रुपयांचा मुद्देमाल हिसकावून नेला. इमामवाडा पोलिसांनी प्रमेश्वर यांच्या तक्रारीवरून कलम ३९४, ३४ नुसार गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान पोलिसांनी तांत्रिक तपास करून ऑटोच्या क्रमांकावरून रामबाग परिसरात राहणाऱ्या तीन विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले. या बालकांनी गुन्ह्याची कबुली देऊन मुद्देमाल काढून दिला. इमामवाडा पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून विधीसंघर्षग्रस्त बालकांना पाटनकर चौकातील बाल सुधारगृहात दाखल केले. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक माने यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन उईके, गणेश गुगुळकर, भगवती ठाकुर, सुशील रेवतकर यांनी केली.

Web Title: Three legal conflict children who robbed a passenger were taken into custody in nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.