रेल्वेची तांब्याची तार चोरणाऱ्या तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 12:29 AM2019-03-08T00:29:27+5:302019-03-08T00:31:15+5:30
रेल्वेच्या इतवारी ते खापरखेडा सेक्शनमध्ये रेल्वेची तांब्याची ओएचई तार चोरी करून त्याची भंगार व्यावसायिकांना विक्री करणाऱ्या तिघांना दक्षिण पूर्ण मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली असून ही तार खरेदी करणाऱ्या दोन भंगार व्यावसायिकांना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभातील रेल्वे सुरक्षा दलाचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वेच्या इतवारी ते खापरखेडा सेक्शनमध्ये रेल्वेची तांब्याची ओएचई तार चोरी करून त्याची भंगार व्यावसायिकांना विक्री करणाऱ्या तिघांना दक्षिण पूर्ण मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली असून ही तार खरेदी करणाऱ्या दोन भंगार व्यावसायिकांना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभातील रेल्वे सुरक्षा दलाचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दपूम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे, सहायक सुरक्षा आयुक्त ए. के. स्वामी यांनी गठित केलेल्या टास्क टीम आणि मोतीबाग रेल्वे सुरक्षा दलाने इतवारी-सावनेर रेल्वे सेक्शनमध्ये तांब्याची तार चोरी करणाऱ्यांविरुद्ध संयुक्त अभियान राबविले. रेल्वे सुरक्षा दलाचे मोतीबागचे वरिष्ठ निरीक्षक गणेश गरकल यांच्या नेतृत्वात ४ मार्चला इतवारी-खापरखेडा रेल्वे सेक्शनमध्ये पाहणी करण्यात आली. यावेळी काही व्यक्ती रेल्वे लाईनवर संशयास्पदरीत्या फिरताना आढळले. घेराव घालून त्यांना पकडण्यात आले. त्यांनी आपले नाव सेवकराम ऊर्फ बडा नानु तेजराम बाहेकर (४०), राधेशाम ऊर्फ गोलु भाऊराव पातोरकर (३०), आणि अक्षय ऊर्फ बॉड योगेश गोंडाणे (२४) रा. चिचोली ता. सावनेर असे सांगितले. त्यांच्या जवळून ओएचई तांब्याची १२ किलोग्रॅम तार किंमत ४५०० जप्त करण्यात आली. आरोपींची चौकशी केली असता त्यांनी यापूर्वीही खापरखेडा येथे तांब्याची तार चोरुन भंगार व्यावसायिकांना विकल्याची माहिती दिली. त्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाने चोरीची तांब्याची तार खरेदी करणाऱ्या शेख तामिज शेख जाफर (५५) रा. जयभीमगर, छिंदवाडा रोड नागपूर आणि अब्दुल मतिन अब्दुल हमीद (४०) रा. महेंद्रनगर, टेकानाका नागपूर या दोघांना अटक केली. दोघांकडून ८८ किलो तांब्याची तार जप्त करण्यात आली. आरोपींची ८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळविण्यात आली आहे. ही कारवाई निरीक्षक गणेश गरकल, उपनिरीक्षक मो. मुगिसुद्दीन, प्रकाश रायसेडाम, के. ए. अन्सारी, विनोद उईके, सतीश इंगळे, ईशांत दीक्षित यांनी पार पाडली.