मेट्रो रेल्वेला पुन्हा तीन जागा हस्तांतरित

By admin | Published: May 15, 2016 02:37 AM2016-05-15T02:37:31+5:302016-05-15T02:37:31+5:30

मेट्रो रेल्वेच्या कामाला आता अधिक गती येत असून जिल्हा महसूल विभागाकडून तीन जागा मेट्रो कॉपोर्रेशनला हस्तांतरित करण्यात आल्या आहेत.

Three more seats have been transferred to Metro Railway | मेट्रो रेल्वेला पुन्हा तीन जागा हस्तांतरित

मेट्रो रेल्वेला पुन्हा तीन जागा हस्तांतरित

Next

भूसंपादन प्रक्रियेला वेग : अडथळे दूर
नागपूर : मेट्रो रेल्वेच्या कामाला आता अधिक गती येत असून जिल्हा महसूल विभागाकडून तीन जागा मेट्रो कॉपोर्रेशनला हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. यात मेयो येथील ७१३ चौरस मीटर, काकडे स्मारक समितीची ३१४ चौरस मीटर तसेस वडपाखड नगर येथील एमएसईबीच्या ३१२२ चौरस मीटर जागेचा समावेश आहे.
मेट्रो रेल्वे प्रकल्प नागपूरसाठी महत्त्वपूर्ण आहे. यावर १० हजार कोटींचा खर्च अपेक्षित असून तीन वर्षात काम पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे. मेट्रो रेल्वेसाठी ५० टक्के रक्कम कर्जातून उभारण्यात येणार आहे. जर्मन बँकेने ३५०० कोटी रुपये कर्ज देण्याची तयारी दर्शविली असून करारही करण्यात आला. या प्रकल्पासाठी ६७ हेक्टर जागेची आवश्यकता असून जवळपास साडेसात हेक्टर जागा खासगी आहे. ही खासगी जागा संपादन कारवाईची प्रक्रिया मेट्रो रेल्वे कॉपोर्रेशनकडून सुरू करण्यात आली आहे.
मेट्रो प्रकल्पासाठी आवश्यक मिहान, पटवर्धन मैदान, शिक्षण उपसंचालक कार्यालय, आरपीटीएस येथील जागा मेट्रो रेल्वे कापोर्रेशनला हस्तांतरित करण्यात आली आहे. मेट्रो रेल्वेचे काम गतीने सुरू असून पिल्लरही तयार करण्यात आले आहे. आता पुन्हा तीन जागा मेट्रो कॉपोर्रेशनला हस्तांतरित करण्यात आल्या. (प्रतिनिधी)

Web Title: Three more seats have been transferred to Metro Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.