तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांसह तीन अधिकाऱ्यांना शिक्षा

By admin | Published: January 30, 2015 12:47 AM2015-01-30T00:47:57+5:302015-01-30T00:47:57+5:30

गोसेखुर्द प्रकल्पामुळे बाधित गावांचे पुनर्वसन करताना न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भंडारा दिवाणी (वरिष्ठ स्तर) न्यायालयाने तत्कालीन जिल्हाधिकारी संभाजीराव सरकुंडे,

Three officers including the District Collector, Education | तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांसह तीन अधिकाऱ्यांना शिक्षा

तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांसह तीन अधिकाऱ्यांना शिक्षा

Next

न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन : दिवाणी न्यायालयाचा निकाल
भंडारा : गोसेखुर्द प्रकल्पामुळे बाधित गावांचे पुनर्वसन करताना न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भंडारा दिवाणी (वरिष्ठ स्तर) न्यायालयाने तत्कालीन जिल्हाधिकारी संभाजीराव सरकुंडे, तत्कालीन उपविभागीय अधिकारी आणि सध्या नागपूरचे निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे व कार्यकारी अभियंता पी.एन. वाकोडीकर यांना तीन महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. गोसेखुर्द प्रकल्पामुळे बाधित खैरी या गावाचे अशोकनगर येथे पुनर्वसन करताना अनियमितता व कायद्याचे उल्लंघन झाले.
याप्रकरणी सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामदास पडोळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी उच्च न्यायालयाने अधिकच्या संपादित जमिनीचा ताबा चार आठवड्यात सोडण्याचे आदेश दिले होते. मात्र या आदेशाचे तत्कालीन जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांनी पालन केले नव्हते. त्यामुळे त्यांना प्रत्येकी दोन हजार रूपयांचा दंड भरावा लागला होता.
न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पडोळे यांनी पुन्हा उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर न्यायालयाने याचिकाकर्ते पडोळे यांच्या जमीन पुनर्वसनाचे काम करण्यासाठी मनाई आदेश दिले होते. या आदेशाला अधिकाऱ्यांनी न जुमानता पुनर्वसनाची कारवाई केली.
न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने तत्कालीन जिल्हाधिकारी सरकुंडे, उपविभागीय अधिकारी कुंभारे, कार्यकारी अभियंता वाकोडीकर यांना दोषी ठरवून तीन महिन्याची शिक्षा सुनावली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Three officers including the District Collector, Education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.