तीन अट्टल चाेरट्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:08 AM2021-08-01T04:08:57+5:302021-08-01T04:08:57+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : घरफाेडी करणाऱ्या तीन अट्टल चाेरट्यांना अटक करण्यात कामठी (नवीन) पाेलिसांना यश आहे. त्यांना इंदाेरा, ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : घरफाेडी करणाऱ्या तीन अट्टल चाेरट्यांना अटक करण्यात कामठी (नवीन) पाेलिसांना यश आहे. त्यांना इंदाेरा, नागपूर येथून ताब्यात घेतल्याची माहिती ठाणेदार विजय मालचे यांनी दिली असून, चाेरट्यांकडून एकूण २ लाख ३१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. रनाळा येथे घरफाेडी केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
गोपाल दुजेराम देवांगण (३१, रा. जकाय, जिल्हा भिलाई, छत्तीसगड), रोहित ऊर्फ राजा युवराज गेडाम (२१, रा. जमनापूर, ता. साकोली, जिल्हा भंडारा) व रितिक ऊर्फ बिरक्या अनिल मेश्राम (२१, रा. डवा, जिल्हा भंडारा) अशी अटक करण्यात आलेल्या चाेरट्यांची नावे आहेत. जगदीश रतनचंद सहदेव (४८, रा. आदर्शनगर, रनाळा, ता. कामठी) हे बुधवारी (दि. २१) कुटुंबीयांसह नागपूरला नातेवाईकाकडे गेले हाेते. दरम्यान, घरी कुणीही नसल्याचे पाहून चाेरट्यांनी त्यांच्या घराच्या दाराचे कुलूप व कडी ताेडून आत प्रवेश केला. त्यांनी कपाटातील ४० ग्राम साेन्याचे बिस्कीट, बॅग, एमएच-३६/एफ-१४४९ क्रमांकाची माेटरसायकल असा एकूण २ लाख ३१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. याप्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला.
ही चाेरी गाेपाल देवांगणने केल्याचे सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पाेलिसांच्या लक्षात आले. ताे व त्याचे साथीदार नागपूर शहरातील इंदाेरा भागात असल्याची माहिती मिळताच पाेलिसांनी शुक्रवारी (दि. ३०) रात्री सापळा रचून तिघांनाही ताब्यात घेत चाैकशी केली. गुन्ह्याची कबुली देताच त्यांना अटक करून त्यांच्याकडून त्यांनी चाेरून नेलेला संपूर्ण २ लाख ३१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
त्यांच्याकडून चाेरीच्या अन्य घटना उघड हाेण्याची शक्यता ठाणेदार विजय मलचे यांनी व्यक्त केली. ही कारवाई दुय्यम पोलीस निरीक्षक मंगेश काळे, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश कन्नाके, पप्पू यादव, प्रमोद वाघ, अनिल बाळराजे, मनोहर राऊत, मंगेश लांजेवार, राजेंद्र टाकळीकर, नीलेश यादव, ललित शेंडे, सुधीर कनोजिया, उपेंद्र यादव, संदीप गुप्ता, सुरेंद्र शेंडे यांच्या पथकाने केली.