वकिलासह तिघांनी घेतला गळफास ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:08 AM2021-02-07T04:08:06+5:302021-02-07T04:08:06+5:30
नागपूर : एका वकिलासह तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. पहिली घटना सदर गांधी चौकात घडली. ॲड. संतोष निळकंठ कन्नाके ...
नागपूर : एका वकिलासह तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. पहिली घटना सदर गांधी चौकात घडली. ॲड. संतोष निळकंठ कन्नाके (४६) असे मृताचे नाव आहे. कन्नाके हे सकाळी १० वाजता स्वयंपाक खोलीत फासावर लटकलेले आढळून आले. ॲड. किन्नाके हे नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयात प्रॅक्टिस करीत होते. ते मूळचे वरोऱ्याचे होते. सदर गांधी चौक येथे ते घनश्याम मोतीलाल यांच्या घरी ते पत्नीसोबत भाड्याने राहत होते. किन्नाके यांच्या लग्नाला दहा वर्षे झाली होती. त्यांना मूलबाळ नव्हते. त्यामुळे ते मानसिक तणावात असल्याचे सांगितले जाते.
दुसरी घटना कळमन्यातील वैष्णोदेवीनगरात शनिवारी दुपारी घडली. अशोक भगीरथ पराते (५०) असे मृताचे नाव आहे. पराते आपल्या राहते घरी दुपारी १ वाजता फासावर लटकलेले आढळून आले. तिसरी घटना नवीन कामठीतील कुंभारे काॅलनी येथे घडली. रवी श्यामराव सहारे (३४)रा. म्हाडा काॅलनी असे मृताचे नाव आहे. सहारे दुपारी १२ वाजता घरात फासावर लटकलेले आढळले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास सुरु आहे.