तीन महिला वकील लिफ्टमध्ये गुदमरून बेशुद्ध : नागपूर जिल्हा न्यायालयातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 10:15 PM2019-06-11T22:15:44+5:302019-06-11T22:17:20+5:30

जिल्हा व सत्र न्यायालयात मंगळवारी दुपारी गंभीर घटना घडली. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर लिफ्ट बंद पडल्यामुळे त्यातील तीन महिला वकील गुदमरून बेशुध्द पडल्या. त्यांच्यासह सुमारे ११ व्यक्ती १० मिनिटे लिफ्टमध्ये अडकले होते. तंत्रज्ञ आल्यानंतर लिफ्टचे दार उघडून सर्वांना बाहेर काढण्यात आले व बेशुद्ध पडलेल्या तीन महिला वकिलांना उपचाराकरिता खासगी रुग्णालयांत भरती करण्यात आले. या घटनेमुळे न्यायालयात खळबळ उडाली होती. लिफ्टमधील व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी आणखी जास्त वेळ लागला असता तर प्राणहानी झाली असती, असे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले.

Three women lawyers stuck in a lift and unconscious : Incident in Nagpur District Court | तीन महिला वकील लिफ्टमध्ये गुदमरून बेशुद्ध : नागपूर जिल्हा न्यायालयातील घटना

तीन महिला वकील लिफ्टमध्ये गुदमरून बेशुद्ध : नागपूर जिल्हा न्यायालयातील घटना

Next
ठळक मुद्देखासगी रुग्णालयात उपचार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा व सत्र न्यायालयात मंगळवारी दुपारी गंभीर घटना घडली. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर लिफ्ट बंद पडल्यामुळे त्यातील तीन महिला वकील गुदमरून बेशुध्द पडल्या. त्यांच्यासह सुमारे ११ व्यक्ती १० मिनिटे लिफ्टमध्ये अडकले होते. तंत्रज्ञ आल्यानंतर लिफ्टचे दार उघडून सर्वांना बाहेर काढण्यात आले व बेशुद्ध पडलेल्या तीन महिलावकिलांना उपचाराकरिता खासगी रुग्णालयांत भरती करण्यात आले. या घटनेमुळे न्यायालयात खळबळ उडाली होती. लिफ्टमधील व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी आणखी जास्त वेळ लागला असता तर प्राणहानी झाली असती, असे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले.
अ‍ॅड. सुधा सहारे, अ‍ॅड. शाहीन शहा व अ‍ॅड. आफरीन अशी बेशुद्ध पडलेल्या महिला वकिलांची नावे आहेत. ही घटना दुपारी ३ च्या सुमारास घडली. संबंधित व्यक्ती न्यायालयाच्या प्रवेशद्वारापुढील एका लिफ्टमध्ये चढले होते. लिफ्ट पाचव्या माळ्यावर पोहचताच वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे लिफ्टचे दार उघडले नाही. परिणामी, सर्वजण आत अडकले. असह्य उकाडा व आॅक्सिजनच्या कमतरतेमुळे सर्वांचा थरकाप उडाला. शरीरातून घामाच्या धारा वाहायला लागल्या. त्यातच तीन महिला वकील एकापाठोपाठ एक बेशुद्ध पडून खाली कोसळल्या. त्यामुळे सोबतच्या व्यक्तींनी आरडाओरड सुरू केली. परिसरात धावपळ उडाली. दरम्यान, तंत्रज्ञांनी दहा मिनिटानंतर लिफ्टचे दार उघडण्यात यश मिळवले.
जिल्हा न्यायालयातील लिफ्टस्ना पॉवर बॅकअप नाही. त्यामुळे अशा घटना नियमित घडत असतात अशी धक्कादायक माहिती वकिलांनी दिली. या घटनेच्या गांभीर्याने न्यायालय परिसरातील अस्ताव्यस्त पार्किंगने भर घातली. बेशुद्ध महिला वकिलांना रुग्णालयात जाण्यासाठी बाहेर काढताना अडचणी आल्या. उच्च न्यायालयाने एका प्रकरणामध्ये जिल्हा न्यायालयात अनुचित घटना घडल्यानंतर रुग्णवाहिका व अग्निशमन वाहनांना सहज आत येता यावे याकरिता मार्ग मोकळा ठेवण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर मोठे वाहन आत येईल एवढी जागा मोकळी ठेवण्यात येत होती. परंतु, आता परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली. त्याचा दुष्परिणाम आज दिसून आला.
वैद्यकीय केंद्र हवे
अशा घटना घडल्यानंतर पीडितांना तत्काळ वैद्यकीय उपचार उपलब्ध होण्याकरिता सरकारने जिल्हा न्यायालयात वैद्यकीय उपचार केंद्र स्थापन करावे. त्या केंद्रामध्ये स्थायी डॉक्टरची नियुक्ती करण्यात यावी. तसेच, रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी. लिफ्टस्ना पॉवर बॅकअप द्यावे.
अ‍ॅड. कमल सतुजा, अध्यक्ष, जिल्हा विधिज्ञ संघटना.
वीज केंद्राची गरज
जिल्हा न्यायालयात स्वतंत्र वीज केंद्र स्थापन करणे आवश्यक आहे. वीज केंद्र मिळाल्यास अशा गंभीर घटना घडणार नाहीत. यासंदर्भात सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. न्यायालयांना अखंड वीज पुरवठा करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्याचे पालन झाले पाहिजे.
 अ‍ॅड. नितीन तेलगोटे, मुख्य जिल्हा सरकारी वकील.

Web Title: Three women lawyers stuck in a lift and unconscious : Incident in Nagpur District Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.