तीन वर्षे आतंकवाद्यांचा केला दटून सामना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 09:10 PM2018-09-15T21:10:28+5:302018-09-15T21:20:06+5:30
जम्मू-काश्मीरला भारताचे मुकुट म्हटल्या जाते. परंतु हे मुकु ट आतंकवाद्यांनी घेरलेले आहे. भारतीय सेना या मुकुटाची डोळ्यात तेल टाकून सुरक्षा करीत आहे. काश्मीर हे सेनेसाठी एक हार्ड टास्क आहे, एक मिशन आहे. या मुकुटाच्या सुरक्षेसाठी नागपुरातील ११८ बटालियन(ग्रेनेडियर ग्रुप)ला तीन वर्षांसाठी जम्मू-काश्मीरमध्ये नियुक्त केले होते. बटालियनच्या जवानांनी आतंकवाद्यांचा दटून सामना करीत जम्मू-काश्मीरची पुरजोर सुरक्षा करून आज ही बटालियन आपल्या मुख्यालयी परतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जम्मू-काश्मीरला भारताचे मुकुट म्हटल्या जाते. परंतु हे मुकु ट आतंकवाद्यांनी घेरलेले आहे. भारतीय सेना या मुकुटाची डोळ्यात तेल टाकून सुरक्षा करीत आहे. काश्मीर हे सेनेसाठी एक हार्ड टास्क आहे, एक मिशन आहे. या मुकुटाच्या सुरक्षेसाठी नागपुरातील ११८ बटालियन(ग्रेनेडियर ग्रुप)ला तीन वर्षांसाठी जम्मू-काश्मीरमध्ये नियुक्त केले होते. बटालियनच्या जवानांनी आतंकवाद्यांचा दटून सामना करीत जम्मू-काश्मीरची पुरजोर सुरक्षा करून आज ही बटालियन आपल्या मुख्यालयी परतली.
नागपूरचा किल्ला हा ११८ इन्फन्ट्री बटालियनचे मुख्यालय आहे. या बटालियनला तीन वर्षापूर्वी काश्मीरमध्ये सुरक्षेसाठी नियुक्त केले होते. बटालियनचे जवळपास ५०० ते ६०० जवान कर्नल एस. राजा वेलू यांच्या नेतृत्वात काश्मिरात तैनात झाले होते. या बटालियनला राजौरी ते पूंछ या ८० किलोमीटरच्या रस्त्याच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. या रस्त्याला आतंकवाद्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी २४ तास डोळ्यात तेल घालून काम सुरक्षा करीत होता. काश्मीरच्या बर्फाळ वातावरणात, आतंकवाद्यांच्या गोळीचा सामना करीत, बारुदी सुरुंग लॅण्डमाईलपासून रस्त्याला सुरक्षित करण्यासाठी ११८ बटालियन आपल्या ताकदीनिशी तीन वर्षे तैनात होती. हा रस्ता सेनेसाठी महत्त्वाचा रस्ता आहे. त्यामुळे रस्त्याची सुरक्षा करताना बर्फाळ वातावरणात खंदक खोदून राहावे लागले. ११८ बटालियनने अतिशय जोखिमेचे हे कार्य तीन वर्षे यशस्वीरीत्या पेलले. आज आपल्या देशसेवेची यशस्वी पताका लावून ही बटालियन सकाळी रेल्वेने आपल्या मुख्यालयी पोहचली. जम्मू-काश्मीरचा थरार पहिल्यांदाच अनुभवणाऱ्या जवानांच्या चेहºयावर एक वेगळीच झळाळी दिसून आली होती. सुभेदार वीरेंद्रसिंग, सुभेदार मेजर रणधीरसिंग, सुभेदार शेषराव मुरोडिया यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण बटालियन सुखरूप परतली.
एका जवानाच्या आयुष्यात जम्मू-काश्मीरच्या सुरक्षेची जबाबदारी दोन ते तीनवेळा येते. तीन वर्षांचा हा टर्म असतो. आमच्या बटालियनला राजौरी ते पूंछ या रस्त्याच्या सुरक्षेची जबाबदारी दिली होती. आतंकवाद्यांपासून हा रस्ता आम्हाला सुरक्षित ठेवायचा होता. आमच्या जवानांच्या सतर्कतेमुळे हा रस्ता तीन वर्षे आम्ही सुरक्षित ठेवू शकलो.
वीरेंद्रसिंग, सुभेदार
भीमरगल्लीमध्ये आतंकवाद्यांचा बॉम्बने अख्खे घर नेस्तनाबूत झाले. मी व माझी चार्ली कंपनी व आमचे मेजर डी. के. सिंग यांनी या हल्ल्यातील जखमी झालेल्यांना वैद्यकीय सुविधा पुरविली. आतंकवाद्यांच्या बॉम्बहल्ल्यात तेथील जनतेची सुरक्षा करणे एक चॅलेंज होते. तसा राजौरी व पूंछ या भागातील नागरिकांचा सेनेला सपोर्ट असल्याने ही तीन वर्षे फार अवघड गेली नाहीत.
शेषराव मुरोडिया, सुभेदार
सेनेत भरती केल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये तीन वर्षांसाठी नियुक्ती एक हार्ड टास्क होता. पण बटालियनमधील वरिष्ठांच्या मार्गदर्शनात यशस्वीरीत्या हा टास्क आम्ही पूर्ण केला. माझ्या आयुष्यात हा वेगळा अनुभव होता.
ईश्वरसिंग, गनेडियल
पुष्पवृष्टीने झाले जवानांचे स्वागत
शनिवारी सकाळी ही बटालियन रेल्वेने प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वर पोहचली. बटालियनच्या स्वागतासाठी माजी सैनिक महिला आघाडीच्या लीना बेलखोडे व शीला टाले यांच्या नेतृत्वात महिलांनी या जवानांचे टिळा लावून व पुष्पवर्षाव करून स्वागत केले. यावेळी भारतमाता की जय, वंदे मातरम् या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. जवानांच्या स्वागताला भाजपा माजी सैनिक आघाडीचे राज्याचे उपाध्यक्ष राम कोरके, शहर अध्यक्ष दिलीप जैस्वाल यांच्यासह अशोक सावरकर, गुंडेराव ढोबळे, गोविंदर तितरमारे, नत्थूजी खांडेकर, अरुण मोर्चापुरे, छाया कडू, जयश्री पाठक, आशा बांते, अरुणा फाले, संगीता काळे, सविता बर्वे, गीता नारनवरे, लता धांडे, जया चापले, नलिनी ढोबळे, मेघा मोर्चापुरे, विद्या लोखंडे, सुनीता कुंभारे, आशा बांते, सुजाता लोंढे, वर्षा शेंडे, नरेश बर्वे, सुभेदार मेजर तांबे, उमेश प्रधान आदी उपस्थित होते.