विनयभंग करणाऱ्याला तीन वर्षे कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 10:44 PM2019-06-28T22:44:39+5:302019-06-28T22:45:42+5:30

विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला ३ वर्षे सश्रम कारावास व ३००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त सश्रम कारावास अशी कमाल शिक्षा सुनावली. न्यायाधीश पी. एफ. सय्यद यांनी हा निर्णय दिला.

Three years imprisonment for molestation | विनयभंग करणाऱ्याला तीन वर्षे कारावास

विनयभंग करणाऱ्याला तीन वर्षे कारावास

googlenewsNext
ठळक मुद्देनागपूर सत्र न्यायालय : नरखेडमधील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला ३ वर्षे सश्रम कारावास व ३००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त सश्रम कारावास अशी कमाल शिक्षा सुनावली. न्यायाधीश पी. एफ. सय्यद यांनी हा निर्णय दिला.
रमेश लक्ष्मण सातपुते असे आरोपीचे नाव असून तो मोवाड येथील रहिवासी आहे. ही घटना फेब्रुवारी-२०१७ मध्ये घडली. त्यावेळी पीडित मुलगी इयत्ता दहावीमध्ये शिकत होती. ती १४ वर्षे वयाची होती. १० फेब्रुवारी २०१७ रोजी मुलगी घरी एकटीच होती. दरम्यान, आरोपीने घरात प्रवेश करून तिचा विनयभंग केला. मुलगी ओरडल्यानंतर आरोपी पळून गेला. दुसऱ्या दिवसी आरोपीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. न्यायालयात सरकारतर्फे अ‍ॅड. श्याम खुळे यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Three years imprisonment for molestation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.