इसिसमध्ये जाणा-या ३ तरूणांना नागपूरमध्ये अटक

By admin | Published: December 26, 2015 11:30 AM2015-12-26T11:30:53+5:302015-12-26T11:53:47+5:30

इसिसमध्ये सामील होण्यास जाणा-या तीन तरूणांना एटीएसने नागपूर विमानतळावर अटक केली.

Three youths in Isis arrested in Nagpur | इसिसमध्ये जाणा-या ३ तरूणांना नागपूरमध्ये अटक

इसिसमध्ये जाणा-या ३ तरूणांना नागपूरमध्ये अटक

Next

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. २६ - कुख्यात दहशतवादी संघटना 'इसिस'चा भारतातील धोका वाढतानाच दिसत आहे. मुंबईच्या मालवणीतील काही तरूण इसिसमध्ये सामील होण्यासाठी गेल्याची बातमी ताजी असतानाच नागपूर एटीएस अधिका-यांनी इसिसमध्ये सामील होण्यास जाणा-या तीन तरूणांना नागपूर विमानतळावर अटक केली. अब्दुल वसीम, उमर हसन फारूखी आणि माज हसन फारूख अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे असून ते तिघेही तेलंगणचे रहिवासी आहेत. ते तिघेही नागपूरमार्गे काश्मीरला जात असताना त्यांना अटक करण्यात आली.
इसिसचा भारतातील धोका वाढत आहे. मुंबईच्या मालवणीतील काही तरूण महिन्याभरापासून घरातून बेपत्ता असून ते इसिसमध्ये सामील होण्यासाठी निघाल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते. त्यापैकी दोन तरूणांना परत आणण्यात एटीएस अधिका-यांना यश मिळाले असले तरी अन्य तरूण अद्याप बेपत्ता आहेत. तर पुण्यात राहणा-या एका १६ वर्षांच्या मुलीला 'इसिस'मध्ये जाण्यापासून रोखण्यात एटीएसला नुकतेच यश मिळाले होते. 

Web Title: Three youths in Isis arrested in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.