थरार! रेल्वे गेटवरून जाताना मालगाडी सुसाट रिव्हर्स आली अन् काळजाचा ठोकाच चुकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2023 08:51 PM2023-05-02T20:51:55+5:302023-05-02T20:52:34+5:30

रेल्वेगाडीच्या रुपात काळच आला होता. मात्र, वेळ आली नसल्याने एका कारचालक आणि बुलेटचालकाचा थोडक्यात जीव वाचला. प्रचंड थरार निर्माण करणारा हा अपघात गोधनी बोखारा रेल्वे गेटवर रविवारी रात्री घडला.

Thrill! While passing through the railway gate, the goods train suddenly came in reverse and Kaalja missed a beat | थरार! रेल्वे गेटवरून जाताना मालगाडी सुसाट रिव्हर्स आली अन् काळजाचा ठोकाच चुकला

थरार! रेल्वे गेटवरून जाताना मालगाडी सुसाट रिव्हर्स आली अन् काळजाचा ठोकाच चुकला

googlenewsNext

नरेश डोंगरे                                                                                                                               
नागपूर : रेल्वेगाडीच्या रुपात काळच आला होता. मात्र, वेळ आली नसल्याने एका कारचालक आणि बुलेटचालकाचा थोडक्यात जीव वाचला. प्रचंड थरार निर्माण करणारा हा अपघात गोधनी बोखारा रेल्वे गेटवर रविवारी रात्री घडला.

या अपघातामुळे प्रचंड मानसिक धक्का बसलेले अमोल धरमारे नामक कारचालक ४८ तास होऊनही त्यातून सावरले नाहीत. धरमारे हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतात. त्यांच्या मेव्हणीचे लग्न गुमथळा येथे असल्याने रविवारी रात्री पत्नीला सासरी पोहचवून ते नागपूरकडे निघाले. रात्री ९:१५ वाजता ते ते गोधनी बोखारा रेल्वे गेटजवळ पोहचले. गेट बंद असल्याने समोर अनेक वाहनं उभी होती. थोड्या वेळाने एक मालगाडी येते आणि धडधडत गोधनीकडे निघून गेली. त्यानंतर काही वेळेतच गेट किपरने फाटक उघडल्याने दहा ते पंधरा वाहनचालक पुढे निघाले.

त्यांच्या मागे एक बुलेटचालक आणि कारचालक अमोल धरमारे यांनीही आपली कार टाकली. त्यांची कार रेल्वे ट्रॅकच्या मध्ये असताना थोड्या वेळेपूर्वी निघून गेलेली मालगाडी वेगात रिव्हर्स येताना दिसली. रेल्वेगाडीच्या रुपात साक्षात काळच येताना दिसल्याने बुलेटचालक, कारचालक धरमारे आणि त्यांच्या मागेपुढे असलेल्या अनेक वाहनचालकांना अक्षरश: कापरे भरले. प्रसंगावधान राखत अनेकांनी आपापली वाहने एकमेकांना ठोकत पुढे मागे केली. धरमारे यांच्या कारची धडक बसल्याने तेसुद्धा लोखंडी पोलवर जाऊन पडले आणि जबर जखमी झाले. तेवढ्यात रेल्वेगाडीने धरमारेंच्या कारला समोरच्या बाजुला जोरदार धडक दिल्याने कार बाजुला फेकली गेली. चारही दार लॉक झाले. कारचा चुराडा झाला. खिडकीची काच तडकून पडल्याने ती फोडून धरमारेंनी अंधारात उडी घेतल्याने पटरीचे लोखंड लागून तेसुद्धा जबर जखमी झाले. या अपघातानंतर संतप्त वाहनचालकांनी गेट किपरवर धाव घेतली. काहींनी दगडफेकही केली. जखमींना खासगी ईस्पितळात दाखल करण्यात आले.

लोको पायलट, गेट किपरसह दोघांवर गुन्हा
उपचारानंतर पहाटे ३ च्या सुमारास धरमारे यांनी कोराडी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी गेट किपर आणि संबंधित रेल्वेगाडीचा चालक (लोको पायलट) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.


रेल्वे अधिकाऱ्यांकडून माहिती नाही

नेमका त्यावेळी गेटकिपर कोण होता आणि त्या रेल्वेगाडीचा चालक कोण होता, त्याबाबत पोलीस तपास करीत आहेत. विशेष म्हणजे, या अपघाताला ४८ तास होत आले असतानाही रेल्वे अधिकाऱ्यांकडून या अपघाताबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

Web Title: Thrill! While passing through the railway gate, the goods train suddenly came in reverse and Kaalja missed a beat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात