तलावात फेकून युवतीला जीवे मारण्याचा प्रयत्न

By Admin | Published: January 31, 2017 02:41 AM2017-01-31T02:41:32+5:302017-01-31T02:41:32+5:30

प्रेमप्रकरणातून एका युवकाने त्याच्या मैत्रिणीला फुटाळा तलावात फेकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

Throwing in the lake and trying to kill the girl | तलावात फेकून युवतीला जीवे मारण्याचा प्रयत्न

तलावात फेकून युवतीला जीवे मारण्याचा प्रयत्न

googlenewsNext

प्रेमप्रकरणातून घडली घटना : आरोपी युवक गजाआड
नागपूर : प्रेमप्रकरणातून एका युवकाने त्याच्या मैत्रिणीला फुटाळा तलावात फेकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी सौरभ बांबोर्डे याला अटक केली.
सौरभ आणि पीडित युवती जरीपटक्यातील रहिवासी आहे. ते एकाच संस्थेत शिकतात. त्यांच्यात खूप दिवसांपासून मैत्रीपूर्ण संबंध आहे. त्यामुळे सौरभ युवतीला लग्न करण्यासाठी अनेक दिवसांपासून मागे लागला आहे. युवतीचा सारखा नकार मिळत असल्याने सौरभला भलताच संशय आला. या पार्श्वभूमीवर, सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास पीडित युवती आपल्या मित्रांसोबत फुटाळा तलावावर आली. ते तेथे गंमतजंमत करीत असताना सौरभ पोहचला. त्याला पाहून युवती भांबावली. त्यानंतर हे दोघे काही अंतरावर चर्चा करू लागले. सूत्रांच्या माहितीनुसार, सौरभने पुन्हा लग्नाचा विषय काढला. तिने नकार देताच सौरभने तिला धक्का देऊन तलावात पाडले.
तिच्या पाठोपाठ सौरभनेही उडी मारली. या अनपेक्षित घडामोडीमुळे युवतीसोबत आलेल्या मित्रांनी तलावात उड्या घेतल्या. त्यांनी आजूबाजूच्यांच्या मदतीने दोघांनाही सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर युवतीला घेऊन तिचे मित्र निघून गेले. दरम्यान, या घटनेचा बोभाटा झाल्याने अंबाझरी पोलीस पथक पोहचले. त्यांनी चौकशी केली असता सौरभ तसेच त्या युवतीचे नाव आणि पत्ता कळला. त्यानंतर जरीपटका पोलिसांच्या मदतीने युवतीचा शोध घेण्यात आला. सायंकाळी याप्रकरणी युवतीची तक्रार नोंदवून पोलिसांनी आरोपी सौरभला हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपात अटक केली.(प्रतिनिधी)
 

Web Title: Throwing in the lake and trying to kill the girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.