तिबेटी निर्वासित महिलांनी बांधली सरसंघचालकांना राखी 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2017 06:24 PM2017-08-07T18:24:12+5:302017-08-07T18:24:30+5:30

 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सोमवारी वेगळ्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले. तिबेटी निर्वासित महिला तसेच अरुणाचल प्रदेशातील विद्यार्थिनींनी सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांना राखी बांधली.

Tibetan Rakhi Sans Sanghchalkars built by refugee women | तिबेटी निर्वासित महिलांनी बांधली सरसंघचालकांना राखी 

तिबेटी निर्वासित महिलांनी बांधली सरसंघचालकांना राखी 

Next

नागपूर, 07 -  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सोमवारी वेगळ्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले. तिबेटी निर्वासित महिला तसेच अरुणाचल प्रदेशातील विद्यार्थिनींनी सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांना राखी बांधली. डोकलाम मुद्द्यावर चीनच्या सीमेवर वातावरण तापले असताना तिबेटी बांधवांच्या पाठीशी संघ भक्कमपणे उभे आहे, हाच संदेश यातून गेला. 
सकाळच्या सुमारास संघ मुख्यालयात रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला. वसुंधरा महिला वसतीगृहातील व मूळच्या अरुणाचलमधील रहिवासी असलेल्या ५ विद्यार्थिनी तसेच अर्जुनी मोरगावजवळील गोठणगाव येथील शिबीरात वास्तव्यास असलेल्या तिबेटी भगिनी यावेळी उपस्थित होत्या. चोग्याल चिंगटो, रिझिंग वोग्मो, थेअरिंग वोग्मो, यांगचेंन थोमवो आणि युटून कॅशिडोमा या भगिनींनी तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी सरसंघचालकांकडे विनंती केली. 
चीनने तिबेटमधील लोकांना विस्थापित केले आहे. गेल्या काही दिवसांपासून तर तेथे सैनिक सराव करुन तेथील स्थानिकांच्या मालमत्तेचे नुकसानेखील होत आहे. दुसरीकडे अरुणाचल प्रदेशातदेखील चीनकडून वारंवार घुसखोरीचा प्रयत्न होत आहे. या पार्श्वभूमीवर येथील भगिनींनी सरसंघचालकांना राखी बांधून पाठीशी उभे राहण्याची विनंती केली. संघ परिवार तसेच केंद्र शासनाने चीनविरोधात आक्रमक भुमिका घेतली आहे. केंद्राने डोकलामच्या मुद्द्यावरुन चीनला खडेबोल सुनावले आहे. तर संघ परिवाराने राष्ट्रीय स्वदेेशी सुरक्षा मोहिमेच्या माध्यमातून चीनी वस्तूंविरोधात दंड थोपटले आहेत. संघ आणि भारत तिबेटी बांधवासोबत असल्याचे आश्वासन यावेळी डॉ.मोहन भागवत यांनी दिले.

Web Title: Tibetan Rakhi Sans Sanghchalkars built by refugee women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.