तिकीट कन्फर्म नाही, मग दंड भरा अन् खाली उतरा; इंग्रजकालीन नियमाची स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीत अंमलबजावणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 04:46 AM2024-07-17T04:46:41+5:302024-07-17T04:47:34+5:30

लांबचा प्रवास म्हटला की, सर्वप्रथम रेल्वेच नजरेसमोर येते. कारण प्रवासात इतर सुविधा तर असतातच मात्र तिकीट कन्फर्म असेल तर बर्थवर झोपूनही जाता येते.

Ticket not confirmed, then pay fine and get down; Implementation of British rule in the seventy-fifth year of independence | तिकीट कन्फर्म नाही, मग दंड भरा अन् खाली उतरा; इंग्रजकालीन नियमाची स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीत अंमलबजावणी

तिकीट कन्फर्म नाही, मग दंड भरा अन् खाली उतरा; इंग्रजकालीन नियमाची स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीत अंमलबजावणी

नागपूर : वेटिंग तिकीट काढून रिझर्वेशनच्या डब्यात बसायचे. पुढे टीसीला दंडाची रक्कम देऊन प्रवास सुरळीत करून घ्यायचा, हा प्रकार आता चालणार नाही. टीसी दंडाची रक्कम वसूल करेलच; मात्र लगेच तुम्हाला त्या डब्यातून खालीदेखील उतरवून देईल. होय, इंग्रजांच्या काळातील या नियमाची आता स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीत अंमलबजावणी सुरू झाली आहे.

लांबचा प्रवास म्हटला की, सर्वप्रथम रेल्वेच नजरेसमोर येते. कारण प्रवासात इतर सुविधा तर असतातच मात्र तिकीट कन्फर्म असेल तर बर्थवर झोपूनही जाता येते. त्यामुळे रोज लाखो प्रवासी रेल्वेचे तिकीट काढतात. मात्र, अनेकांना कन्फर्म तिकीट मिळत नाही. त्यामुळे अनेक जण वेटिंग तिकीट घेऊन आरक्षित डब्यातून प्रवास करतात. गेल्या जून महिन्यापर्यंत वेटिंगचे तिकीट जवळ घेऊन प्रवासी आरक्षित कोचमध्ये चढून प्रवास करायचे. तिकीट तपासणीस जवळ आल्यास तो ते तिकीट पाहून संबंधित प्रवाशाकडून दंडाची रक्कम घेऊन पावती हातात ठेवायचा आणि निघून जायचा. दंड भरल्यामुळे संबंधित प्रवासी पुढचा प्रवास त्याच कोचमधून करीत होता. मात्र आता दंड भरल्यावरदेखील संबंधित प्रवासी त्या कोचमधून प्रवास करू शकणार नाही. कारण अशा प्रवाशांबाबत ओरड, तक्रारी वाढल्याने रेल्वेने आता वेटिंग तिकिटावर रेल्वेतून प्रवास करण्यासंदर्भात मोठे बदल केले आहेत. त्यानुसार, वेटिंग तिकिटावर रेल्वे प्रवास केल्यास टीसी संबंधित प्रवाशाकडून दंडाची रक्कम वसूल करेल. एवढेच नव्हे तर दंड घेतल्यानंतर त्या प्रवाशाला पुढच्या स्थानकावर त्या डब्यातून उतरवून सुद्धा देणार आहे.

... तर तिकीट रद्द करून रक्कम परत घ्या !

काउंटरवर जाऊन तुम्ही तिकीट काढले असेल आणि ते प्रवासाच्या वेळेपर्यंत कन्फर्म झाले नसेल तर तिकीट रद्द करून प्रवासी आपले पैसे परत घेऊ शकतात.

असे न करता त्या तिकिटावर प्रवास केल्यास तिकीट कन्फर्म होणार नाही. नाहक दंडाचीही रक्कम भरावी लागणार आहे.

 

 

Web Title: Ticket not confirmed, then pay fine and get down; Implementation of British rule in the seventy-fifth year of independence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे