चार हजारांवर टायचे कलेक्शन

By Admin | Published: May 19, 2017 02:57 AM2017-05-19T02:57:17+5:302017-05-19T02:57:17+5:30

छंद व्यक्तीला कशी ओळख मिळवून देऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे नागपूरचे दीपक शर्मा. दीपक शर्मा हे

Tie collection of four thousand | चार हजारांवर टायचे कलेक्शन

चार हजारांवर टायचे कलेक्शन

googlenewsNext

दीपक शर्मा ठरले ‘टायमॅन’: गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली दखल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : छंद व्यक्तीला कशी ओळख मिळवून देऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे नागपूरचे दीपक शर्मा. दीपक शर्मा हे १९८८ मध्ये टायच्या प्रेमात पडले. ७० रुपयांमध्ये त्यांनी पहिला टाय खरेदी केला आणि त्यांना टायखरेदीचा छंदच जडला. छंद पुढे इतका वाढला की त्यांच्या या छंदाची दखल गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रिकॉर्डने घेतली आणि आज ते जगभरात ‘टायमॅन’ म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत.
पेहराव्यातील टाय (कंठलंगोट) संस्कृती विदेशी असली तरी, नागपूरचे दीपक शर्मा या टायमुळे जगभरात प्रसिद्ध झाले आहेत. ईस्ट इंडिया कंपनीने भारतीय पेहरावात टाय आणला. दीपक शर्मा हे १९८८ मध्ये टायच्या प्रेमात पडले. ७० रुपयांमध्ये त्यांनी पहिला टाय खरेदी केली. परंतु टायमुळे आपण जगप्रसिद्ध होऊ अशी कुठलीही कल्पना केली नव्हती. टाय घालण्याची आवड असल्याने ते दर महिन्याला आपल्या पगारातील १० टक्के रकमेतून टायची खरेदी करायचे. २००६ मध्ये त्यांच्याजवळ टायचा भरपूर संग्रह झाला होता. त्यांच्या एका मित्राने टायचा संग्रह होऊ शकतो, हे त्यांच्या निदर्शनास आणले आणि दीपक शर्मा यांनी त्या दिशेने प्रयत्न सुरू केले. आज त्यांच्याजवळ चार हजारांवर टायचा संग्रह आहे. त्यातील २२८२ टाय हे थिमबेस्ड आहेत. कच्छचा हॅण्डमेड टॉय, वेगवेगळ्या देशाच्या नावाचा टाय, खेळाच्या, व्हॅलेंटाईन डेचा सामाजिक संदेश देणारे १२० टाय त्यांच्या संग्रहात आहेत. जगातील १४० कंपन्यांचे, ४१ देशांचे टाय त्यांच्या संग्रहात आहेत. ३६५ दिवसात ते कुठलाही टाय रिपिट करीत नसल्याने लिम्का बुक आॅफ रेकॉर्डने त्यांचा गौरव केला आहे. त्यांच्या नावाने विक्रमांच्या ५८ नोंदी आजवर झाल्या आहेत.

Web Title: Tie collection of four thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.