उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील बछड्यांची पर्यटकांत क्रेझ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 10:44 AM2019-06-26T10:44:25+5:302019-06-26T10:45:00+5:30

उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याच्या गोठणगाव प्रवेशद्वारावर सध्या पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. अभयारण्यातील टी-थ्री वाघिणीने चार बछड्यांना जन्म दिला आहे. या चारही बछड्यासह वाघिणीचा मुक्तसंचार उमरेड - कऱ्हांडला अभयारण्याला भेट देणाऱ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

Tiger cubs attracted tourists in Umared Karhandla Tiger reserve | उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील बछड्यांची पर्यटकांत क्रेझ

उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील बछड्यांची पर्यटकांत क्रेझ

Next
ठळक मुद्देगोठणगाव गेटला सोनेरी दिवस

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याच्या गोठणगाव प्रवेशद्वारावर सध्या पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. अभयारण्यातील टी-थ्री वाघिणीने चार बछड्यांना जन्म दिला आहे. या चारही बछड्यासह वाघिणीचा मुक्तसंचार उमरेड - कऱ्हांडला अभयारण्याला भेट देणाऱ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील ‘जय’ वाघ आशिया खंडातील सर्वांत मोठा आणि रुबाबदार म्हणून प्रसिद्ध होता. जयच्या दर्शनासाठी देश- विदेशांतील पर्यटक व विविध क्षेत्रांतील सेलिब्रिटींनी या अभयारण्याला भेटी दिल्या. जयच्या मृत्यूनंतर येथे पर्यटकांचा ओघ कमी झाला. जयचे शावक असलेले बिट्टू व श्रीनिवास यांना पाहण्यासाठी पर्यटक येत होते. मात्र कालांतराने तेही दिसेनासे झाले.
गत दोन महिन्यांपूर्वी अभयारण्यातील टी-थ्री (पूर्वीची टी-सिक्स) या फेरी वाघिणीने चार बछड्यांना जन्म दिला. अभयारण्याच्या गोठणगाव परिसरात तिचा बछड्यासह मुक्तसंचार सुरू आहे. टी-थ्री वाघिण बछड्यासह जंगलातील पाणवठ्याच्या ठिकाणी हमखास दर्शन देत असल्याने वन्यप्रेमींचा ओघ गोठणगाव गेटकडे वाढला आहे.

Web Title: Tiger cubs attracted tourists in Umared Karhandla Tiger reserve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ