वडगाव डॅमजवळ वाघाने मांडला ठिय्या ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:06 AM2021-07-05T04:06:39+5:302021-07-05T04:06:39+5:30
पिटीचुआ, जामगड, चारगावच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा नागपूर : उमरेडनजीक फुकेश्वर गावाजवळ भटकंती करणाऱ्या वाघाने आता वडगाव डॅमजवळ ठिय्या मांडला ...
पिटीचुआ, जामगड, चारगावच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
नागपूर : उमरेडनजीक फुकेश्वर गावाजवळ भटकंती करणाऱ्या वाघाने आता वडगाव डॅमजवळ ठिय्या मांडला आहे. वन विभागाच्या शाेध पथकाला लाेअर वेणा जलाशय व वडगाव डॅमजवळ वाघाचे लाेकेशन मिळाले आहे. हे जंगल मुनिया कन्झर्व्हेशन रिझर्व्हअंतर्गत असून, हा भाग उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्य आणि ताडाेबा व्याघ्र प्रकल्पामधील काॅरिडाेर मानला जाताे. यास लागून जुनापाणी, सिंदीविहिरी, चारगाव आणि जामगड हे क्षेत्रही दाट जंगलाचा भाग आहे आणि अनेक वर्षांपासून हे क्षेत्र वाघाचे अधिवास राहिले आहे. याच क्षेत्रात अडीच वर्षीय वाघ शिकारीच्या शाेधात फुकेश्वर गावापर्यंत पाेहोचल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित गावांमध्ये जाऊन गावकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. गावकऱ्यांनी पाच ते सहा लाेकांच्या समूहात राहून शेतात काम करण्याचा, पहाटे आणि रात्री एकट्याने बाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या आहेत.