काेंढाळी परिसरात वाघाची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:07 AM2021-07-04T04:07:17+5:302021-07-04T04:07:17+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी : काेंढाळी (ता. काटाेल) व कारंजा (घाडगे) (जिल्हा वर्धा) वनपरिक्षेत्राच्या सीमावर्ती भागात वाघाचा वावर वाढला ...

Tiger terror in Kaendhali area | काेंढाळी परिसरात वाघाची दहशत

काेंढाळी परिसरात वाघाची दहशत

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेंढाळी : काेंढाळी (ता. काटाेल) व कारंजा (घाडगे) (जिल्हा वर्धा) वनपरिक्षेत्राच्या सीमावर्ती भागात वाघाचा वावर वाढला असून, या वाघाने महिनाभरात कारंजा (घाडगे) तालुक्यातील दाेन शेतकऱ्यांचा बळी घेतला आहे. हा वाघ काेंढाळी परिसरात फिरत येत असल्याने या भागात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागातील मजूर शेतात कामाला जाण्यास धजावत नाहीत.

वाघाने शेतकऱ्याचा बळी घेतल्याच्या दाेन्ही घटना राहटी (तार. कारंजा घाडगे) शिवारात घडल्या आहेत. हा परिसर काेंढाळी लगत असल्याने, तसेच तेथील नागरिक काेंढाळी परिसरातील नागरिकांच्या सतत संपर्कात येत असल्याने याही भागात वाघाची दहशत निर्माण झाली आहे. या भागातील नागपूर जिल्ह्यातील (ता. काटाेल) मासोद, कामठी, घोटीवाडा, खैरी, खापरी, तसेच वर्धा जिल्ह्यातील (ता. कारंजा घाडगे) धानोली, नागाझिरी, उंबरविहिरी या परिसरात वाघ व बिबट यांची संख्या वाढली आहे, अशी माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली असून, हा भाग बाेर (जिल्हा वर्धा) व्याघ्र प्रकल्पालगत असल्याचेही सांगितले.

नागपूर व वर्धा जिल्ह्यांच्या सीमावर्ती गावांमधील मजूर शेतीच्या कामासाठी दाेन्ही जिल्ह्यांतील शिवारात जातात. वाघाच्या दहशतीमुळे त्यांनी शेतात कामाला जाणे बंद केले असून, एकीकडे मजुरांवर आर्थिक संकट काेसळले आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांचे पीक मशागतीअभावी खराब हाेण्याची वेळ ओढवली आहे. त्यामुळे वाघाचा बंदाेबस्त करून ही समस्या साेडविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

...

खाद्याच्या शाेधात गावांकडे मार्चा

वाघ व बिबट्यांच्या संख्येच्या तुलनेत या भागातील जंगलाचा आकार लहान झाला आहे. जंगलात पुरेसे खाद्य मिळत नसल्याने ते खाद्य व पाण्याच्या शेतात गावाकडे येतात. त्यातून शेतकरी व मजुरांवरील त्यांच्या हल्ल्यात वाढत आहेत. जंगलालगतच्या पठारी भागात चरायला जाणारी गुरे या हिंस्त्र पशूंच्या पथ्यावर पडतात. वाघाच्या हल्ल्यात श्रीराम मुक्ता बिटने (वय ७२, रा. राहटी, ता. कारंजा घाडगे, जिल्हा वर्धा) या गुराख्याचा १ जुलै राेजी मृत्यू झाला. वाघाने त्याचे डाेके शरीरापासून वेगळे केले हाेते. महिनाभरापूर्वी वाघाने नांदाेरा शिवारात एका, तर त्यापूर्वी दाेन शेतकऱ्यांचा बळी घेतला.

......

वाघाने दाेघांचा बळी घेतल्यानंतर काेंढाळी वनपरिक्षेत्रातील घुबडी, खापा, घोटीवाडा, कावडीमेट, किनकीडोडा या भागात कार्यरत असलेल्या सर्व वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना अलर्ट करण्यात आले आहे. या भागात गस्त वाढविली आहे. सीमावर्ती भागातील शेतकरी, मजूर व इतरांनी अंधार हाेण्यापूर्वी घरी परत यावे. रात्रीच्या वेळी अथवा पहाटेच्या सुमारास कुणीही त्यांच्या जंगलालतच्या शेतात जाऊ नये.

- फरीद आझमी, वनपरिक्षेत्र अधिकारी,

काेंढाळी, ता. काटाेल.

Web Title: Tiger terror in Kaendhali area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.