पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघाच्या छाव्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 03:29 PM2018-03-12T15:29:56+5:302018-03-12T15:30:12+5:30
आईपासून ताटातूट झालेल्या चार महिन्याच्या वाघाच्या बछड्याचा मृतदेह रविवारी पेंच व्याघ्र प्रकल्पातील सिल्लारी रेंजच्या पिवरथडी परिसरात आढळून आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आईपासून ताटातूट झालेल्या चार महिन्याच्या वाघाच्या छाव्याचा मृतदेह रविवारी पेंच व्याघ्र प्रकल्पातील सिल्लारी रेंजच्या पिवरथडी परिसरात आढळून आला. हा छावा ५ मार्चपासून महाराष्ट्र व मध्य प्रदेशचा सीमाभाग असलेल्या पिवरथडी परिसरात एकटाच फिरत असल्याचे आढळले होते. तेव्हापासून त्याच्यावर कॅमेराद्वारे लक्ष ठेवल्या जात असल्याची माहिती वनविभागातर्फे देण्यात आली आहे. ९ मार्चलाही तो फिरत असल्याचे दिसले. दोन्ही राज्यातील वनविभागाचे कर्मचारी या बछड्याची वाघिणीसोबत भेट व्हावी यासाठी प्रयत्न करीत होते. शनिवारी मात्र तो दिसेनासा झाला. आईसोबत भेट होणार नाही अशी खात्री बाळगता व त्याच्या प्रकृतीचा विचार करता वनविभागाच्या पथकाने रविवारी शोधमोहिम सुरू केली. यादरम्यान वनपरिसरातील दाट गवतामध्ये त्याचा मृतदेह आढळल्याचे सांगण्यात येत आहे.