पेंचमध्ये वाढताहेत वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 11:12 AM2018-10-05T11:12:00+5:302018-10-05T11:13:24+5:30

उपराजधानीला ‘टायगर कॅपिटल’चा दर्जा मिळवून देण्यात पेंच व्याघ्र प्रकल्पाची भूमिका महत्त्वाची आहे. मागील काही वर्षात पेंच जंगलात वाघांची संख्या चांगलीच वाढत आहे.

Tigers growing in the screw | पेंचमध्ये वाढताहेत वाघ

पेंचमध्ये वाढताहेत वाघ

Next
ठळक मुद्देतीन गावांसह इतरांच्या पुनर्वसनाचे प्रयत्न२५८ वर्ग किमी कोरमध्ये मानसिंहदेव अभयारण्य

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीला ‘टायगर कॅपिटल’चा दर्जा मिळवून देण्यात पेंच व्याघ्र प्रकल्पाची भूमिका महत्त्वाची आहे. मागील काही वर्षात पेंच जंगलात वाघांची संख्या चांगलीच वाढत आहे.
विदर्भात वन्यजीवांनी परिपूर्ण असलेल्या पेंच जंगलाला १९९९ मध्ये पेंच व्याघ्र संरक्षित क्षेत्र म्हणून नोटिफाईड करण्यात आले. यादरम्यान केवळ २५७.२६ वर्ग किमीच्या कोर क्षेत्रासह पेंच सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प होते. परंतु वन संरक्षणावर अधिक लक्ष दिल्याने पेंचमध्ये वाघांच्या संख्येत वाढ नोंदविल्या जाऊ लागली. यामुळे वाघांचे अधिवास क्षेत्र वाढवण्याच्या प्रयत्नांतर्गत काही वर्षांपूर्वी मानसिंहदेव अभयारण्याचे १८२ वर्ग किमी वनक्षेत्र मिळवून पेंचचे कोर (कॅपिटल हॅबिटेट) क्षेत्र एकूण ४३९.२६ वर्ग किमी झाले आहे. यासोबतच नागलवाडी, सुरेवानी, खुबाळा आदी वन विकास महामंडळ व व प्रादेशिक वन विभागाच्या वनक्षेत्राला बफर क्षेत्र म्हणून पेंचला जोडण्यात आले आहे. याप्रकारे पेंच व्याघ्र संरक्षित क्षेत्राचे एकूण क्षेत्रफळ ७४१.२६ वर्ग किमी झाले आहे. यानंतर पेंचमध्ये वाघांची संख्या २०१३-१४ मध्ये १९ वरून वाढून २०१६-१७ मध्ये ४४ पर्यंत पोहोचली आहे.
ही माहिती वन्यजीव सप्ताहांतर्गत आयोजित पत्रपरिषदेत पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक रविकिरण गोवेकर यांनी दिली. त्यांनी सांगितले की, २०१७-१८ च्या व्याघ्र गणनेचा रिपोर्ट जानेवारी २०१९ पर्यंत स्पष्ट होईल. गोवेकर यांनी सांगितले की, वन्यजीवांच्या क्षेत्रात मानवाचा हस्तक्षेप कमी करण्याच्या उद्देशाने कोर क्षेत्राला लागून असलेल्या घाटकोपरा, सालईघाट, फिरंगीसरा आणि इतर गावांतील गावकऱ्यांच्या सहमतीने वनक्षेत्रातून बाहेर पुनर्वसन करण्याचे प्रयत्न केले जात आहे.
दुसरीकडे तोतलाडोह कॉलनी पूर्णपणे हटवून फुलझरी गावाच्या अर्ध्या गावकऱ्यांचे वनक्षेत्राच्या बाहेर पुनर्वसन करण्यात आलेले आहे. वन परिक्षेत्र अधिकारी सचिन जाधव यांच्यानुसार केवळ नागलवाडी परिक्षेत्रांतर्गत ११ वाघ आणि ६ वाघाच्या बछड्यांची उपस्थिती नोंदविण्यात आली आहे. वन विकास महामंडळाचे वनक्षेत्र पेंचमध्ये सामील झाल्याने वन्यजीवांना आता विस्तीर्ण हिरवेगार जंगल उपलब्ध झाले आहे.
पर्यटनातून गावातील विकास कामे
क्षेत्र संचालक गोवेकर यांनी सांगितले की, पेंचमध्ये वर्ष २०१७-१८ मध्ये २९,३४९ पर्यटकांकडून २ कोटी १ लाख ९३ हजार रुपयाचा महसूल मिळाला आहे. पर्यटन हा मुख्य उद्देश नाही. परंतु पर्यटनाच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नातून बफर वनक्षेत्रातील गावांमध्ये हँडपंप, गॅस सिलिंडरचे वितरण आणि गावातील बेरोजगार युवकांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन नोकरी लवण्यात मदत केली जात आहे.

Web Title: Tigers growing in the screw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ