हुंकार सभेसाठी पोलिसांचा नागपुरात चोख बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 10:53 PM2018-11-24T22:53:52+5:302018-11-24T22:55:01+5:30

क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित हुंकार सभेसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे. सभेला ठिकठिकाणचे साधू-संत तसेच विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. शिवाय मोठ्या संख्येत कार्यकर्ते येण्याची शक्यता असल्यामुळे पोलिसांनी त्रिस्तरीय बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.

Tight Police Bandobast for Hunkar Sabha in Nagpur | हुंकार सभेसाठी पोलिसांचा नागपुरात चोख बंदोबस्त

हुंकार सभेसाठी पोलिसांचा नागपुरात चोख बंदोबस्त

Next
ठळक मुद्देत्रिस्तरीय बंदोबस्ताचे नियोजन : गस्ती पथकेही दिवसभर फिरणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित हुंकार सभेसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे. सभेला ठिकठिकाणचे साधू-संत तसेच विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. शिवाय मोठ्या संख्येत कार्यकर्ते येण्याची शक्यता असल्यामुळे पोलिसांनी त्रिस्तरीय बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.
रविवारी, २५ नोव्हेंबर रोजी क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानात दुपारी ३ वाजता ही सभा होईल. सभेचे स्टेज कसे राहील, किती व्यक्तीसाठी खुर्च्यांची व्यवस्था असेल, किती लोकांना सभास्थळी सोडता येईल, गर्दीमुळे अनुचित प्रकार होऊ नये म्हणून काय करता येईल, यासंबंधी परिमंडळ-४ चे पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी आयोजकांशी चर्चा केली. त्यानंतर अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना वाहनातूनच थेट मंचापर्यंत जाण्यासाठी मार्ग तयार करण्यात आला. सभास्थळी (आतमध्ये), बाहेर आणि आजूबाजूच्या परिसरात असा त्रिस्तरीय पोलीस बंदोबस्त राहणार आहे. सभास्थळाच्या आजूबाजूला सकाळपासूनच गस्ती पथके आणि बीट मार्शल गस्त करणार आहेत. सभेला संबोधित करण्यासाठी आणि सभेला हजर राहणाऱ्यांसाठी येण्या-जाण्याचे चार मार्ग तयार करण्यात आले आहेत. आजूबाजूला आठ ठिकाणी दुचाकी, कार आणि बसेसची वेगवेगळी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाल्यास बाजूच्या मैदानात एलसीडी प्रोजेक्टरची व्यवस्था करण्यात आली आहे. सभास्थळाच्या आजूबाजूच्या भागातून वाहतूक व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात वळविण्यात येणार आहे. शहराच्या सर्व सीमांवर पॉर्इंट लावण्यात आले आहेत. संशयास्पद व्यक्ती वाहनाची तेथे तपासणी केली जाणार आहे. परिमंडळ-४चे उपायुक्त नीलेश भरणे बंदोबस्त प्रमुख असतील. सोबतच वाहतूक विभागाचे उपायुक्त राजतिलक रोशन आणि चार सहायक आयुक्त, ६५ पोलीस उपनिरीक्षक आणि निरीक्षक तसेच ३०० कर्मचारी सभेच्या बंदोबस्ताला तैनात राहतील. त्यांच्या मदतीला शीघ्र कृती दल, दंगा नियंत्रण पथकही राहील.
पोलिसांची सर्वत्र नजर
यासंबंधाने पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी पोलिसांचा बंदोबस्त चोखराहील, अशी ग्वाही दिली. पोलिसांची सर्वत्र नजर असून, कुठेही कसलाही अनुचित प्रकार घडणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Tight Police Bandobast for Hunkar Sabha in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.