गळ्यात तारांचा फास अडकून वाघिणीचा मृत्यू, यवतमाळ जिल्ह्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 02:50 PM2021-03-23T14:50:11+5:302021-03-23T14:58:14+5:30
मृत वाघिणीच्या गळ्यात तारांचा फास अडकून असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे वाघिणीच्या गळ्यावर जखमाही झाल्या आहेत.
यवतमाळ(वणी) : गळ्यात तारांचा फास अडकून वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घोन्सा लगतच्या शेतशिवारात उघडकीस आली. वाघिणीचे वय अंदाजे चार वर्ष असल्याचे सांगितले जाते.
घोन्सा ते सोनेगाव पांदण रस्त्यावर असलेल्या एका नाल्यात एका शेळी राखणाऱ्याला ही वाघीण मृतावस्थेत पडून असल्याचे दिसून आले. यानंतर या घटनेची माहिती वाऱ्यासारखी घोन्सा परिसरात पसरली. नंतर नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. यासंदर्भात वनविभागालाही माहिती देण्यात आली असून वनविभागाचे पथक घटनास्थळाकडे रवाना झाले आहे.
गळ्यात तारांचा फास अडकून वाघिणीचा मृत्यू, यवतमाळ जिल्ह्यातील घटना#tigresspic.twitter.com/cESHh8v52w
— Lokmat (@MiLOKMAT) March 23, 2021
मृत वाघिणीच्या गळ्यात तारांचा फास अडकून असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे वाघिणीच्या गळ्यावर जखमाही झाल्या आहेत.