टिक-टॉक बनविणाऱ्या गँगस्टरला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:52 AM2019-05-16T00:52:39+5:302019-05-16T00:53:35+5:30

पोलिसांच्या वाहनात टिक-टॉक व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड करणारा तडीपार गुन्हेगार मोबीन अहमद अखेर पोलिसांच्या हाती लागला. कोराडी पोलिसांनी त्याला अटक केली. झोन-५ चे डीसीपी हर्ष पोद्दार यांनी बुधवारी याची माहिती दिली.

tik-talk maker Gangster arrested | टिक-टॉक बनविणाऱ्या गँगस्टरला अटक

टिक-टॉक बनविणाऱ्या गँगस्टरला अटक

Next
ठळक मुद्देपोलिसांची उडाली होती झोप : तडीपारची कारवाई होणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलिसांच्या वाहनात टिक-टॉक व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड करणारा तडीपार गुन्हेगार मोबीन अहमद अखेर पोलिसांच्या हाती लागला. कोराडी पोलिसांनी त्याला अटक केली. झोन-५ चे डीसीपी हर्ष पोद्दार यांनी बुधवारी याची माहिती दिली.
टिपू सुलतान चौक, यशोधरानगर येथील रहिवासी असलेला मोबीन अहमद (३०) हा चामा गँगचा प्रमुख आहे. त्याच्याविरुद्ध २००३ मध्ये पहिला गुन्हा दाखल झाला होता. तो २०१३ पासून गोवंशच्या तस्करीत सामील होता. त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, चोरी, लुटमार, मारहाण, दंगा आदी गुन्हे दाखल आहेत. त्याने यवतमाळ येथील वणीमध्ये शासकीय अधिकाºयावर हल्लासुद्धा केला होता. यवतमाळमधील खुनाचा प्रयत्न केल्याच्या दोन प्रकरणात पोलीस त्याच्या शोधात होते. यानंतरही तो शहरात बिनधास्तपणे फिरत होता. त्याच्याविरुद्ध २०१३ मध्ये तडीपार आणि एमपीडीएची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही तो सक्रिय होता. काही दिवसांपूर्वी मोबीनने टिक-टॉक व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर अपलोड केला होता. हा व्हिडिओ कोराडी पोलीस ठाण्यासमोरच बनविला होता. व्हिडिओमध्ये तो एखाद्या चित्रपटाप्रमाणे पोलीस वाहनातून निघताना दिसून येत आहे. व्हिडिओत तो स्वत:ला गँगस्टर असल्याचे सांगत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पोलिसात खळबळ उडाली होती. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी मोबीनला तत्काळ अटक करण्याचे निर्देश दिले होते.
या घटनेनंतर पोलीस मोबीनच्या शोधात होते. पोलिसांनी त्याच्या
कुटुंबीयांवर खूप दबाव टाकला. तेव्हा बुधवारी तो पोलिसांच्या स्वाधीन झाला.
याची माहिती देताना डीसीपी हर्ष पोद्दार यांनी सांगितले की, आतापर्यंतच्या तपासात मोबीनने टिक-टॉक व्हिडिओ ४ फेब्रुवारी रोजी बनविला होता. त्यानंतर त्याला तडीपार करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.
व्हिडिओ बनविताना व्हॅनमध्ये कुणीही नसल्याचे दिसून येते. परंतु त्या दिवशी पोलीस वाहनाचा चालक होता. त्याच्याविरुद्ध निष्काळजीपणा केल्याबद्दलची कारवाई करण्यात येईल. त्याच्या निष्काळजीपणामुळे मोबीनला व्हिडिओ बनविण्याची संधी मिळाली. या घटनेत मोबीनच्या विरुद्ध कोराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात त्याला अटक करण्यात आली. तेथून सुटका होताच तडीपारची कारवाई केली जाईल. आतापर्यंत त्याच्यासोबतच्या विविध गुन्ह्यांमध्ये आठ ते नऊ साथीदार सहभागी असल्याचेही उघडकीस आले आहे.
मोबीनविरुद्ध मकोका किंवा एमपीडीएची कारवाईसुद्धा करण्याबाबत विचार सुरू असल्याचेही डीसीपी पोद्दार यांनी सांगितले. फरार असताना मोबीन छत्तीसगडमध्ये होता. त्याच्याविरुद्ध छत्तीसगड, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातही गुन्हे दाखल असल्याबाबत विचारणा केली असता, याबाबत इतर राज्यांमधून माहिती मागविली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Web Title: tik-talk maker Gangster arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.