हात-पायांमध्ये मुंग्या येणे हे औषधांचे साईड इफेक्ट;  लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2023 08:00 AM2023-05-07T08:00:00+5:302023-05-07T08:00:12+5:30

Nagpur News औषधांमधील ‘लिनेझोलीड’ औषधीचा सर्वाधिक दुष्परिणाम (साइड इफेक्ट) हाता-पायाला मुंग्या आल्यासारखा होतो, हा निष्कर्ष मेयोच्या श्वसनरोग विभागाने नुकत्याच केलेल्या एका अभ्यासातून काढला.

Tingling in the hands and feet is a side effect of the medicine; Consult a doctor as soon as symptoms appear | हात-पायांमध्ये मुंग्या येणे हे औषधांचे साईड इफेक्ट;  लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्या

हात-पायांमध्ये मुंग्या येणे हे औषधांचे साईड इफेक्ट;  लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्या

googlenewsNext

सुमेध वाघमारे

नागपूर : क्षयरोगाचे जे रुग्ण व्यवस्थित औषधे (डॉट्स) घेत नाहीत किंवा अर्धवट घेतात त्यांना क्षयरोगाची पुढची पायरी ‘मल्टिड्रग रेझिसटन्ट ट्युबरक्युलॉसिस’ (एमडीआर-टीबी) होतो. त्यांना दिल्या जाणाऱ्या औषधांमधील ‘लिनेझोलीड’ औषधीचा सर्वाधिक दुष्परिणाम (साइड इफेक्ट) हाता-पायाला मुंग्या आल्यासारखा होतो, हा निष्कर्ष मेयोच्या श्वसनरोग विभागाने नुकत्याच केलेल्या एका अभ्यासातून काढला. एप्रिल २०२३ मध्ये, ‘द इंडियन जर्नल आॅफ ट्युबरक्युलॉसिस’या जर्नलमध्ये हा संशोधन अभ्यास प्रकाशित करण्यात आला.

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेयो) श्वसनरोग विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. ग्यानशंकर मिश्रा यांनी हा अभ्यास केला. सह-संशोधकांमध्ये या विभागाच्या प्रमुख प्राध्यापक डॉ. राधा मुंजे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सदफ खतीब व ऑस्ट्रेलियाच्या सिडनी विद्यापीठातील ‘सिडनी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फेक्शियस डिसीज’चे जॅन-विलम अल्फेनर यांचा समावेश होता.

-१०६ ‘एमडीआर-टीबी’ रुग्णांवर झाला अभ्यास

डॉ. मिश्रा यांनी ‘लोकमत’ला सांगितले, ‘एमडीआर-टीबी’ रुग्णांना दिल्या जाणाऱ्या औषधांच्या दुष्परिणामावर हा अभ्यास करण्यात आला. मार्च २०२० ते एप्रिल २०२२ या कालावधीतील नागपुरातील १०६ रुग्णांचा यात समावेश होता. अभ्यासात असे आढळून आले की, ‘लिनेझोलीड’ औषधीचा दुष्परिणाम ४२.४५ टक्के रुग्णांमध्ये दिसून आला. ९३.३३ टक्के रुग्णांमध्ये हाता-पायाला मुंग्या येणे म्हणजे ‘पेरिफेरल न्यूरोपॅथी’ आढळून आला. याच औषधीच्या संबंधित दुष्परिणामांमध्ये दृष्टी समस्या (ऑप्टिक न्यूराईटिस); थकवा, अशक्तपणा, फिकटपणा (अॅनेमिया); पोटात दुखणे, उलट्या हेसुद्धा दिसून आले.

-स्त्री आणि तरुण रुग्णांना दुष्परिणामाचा धोका अधिक

अभ्यासात असेही आढळून आले की, स्त्रिया आणि तरुण रुग्णांना ‘लिनेझोलीड’ औषधीचा दुष्परिणामांचा धोका अधिक असतो. साइड इफेक्ट्समुळ ४२.२२ टक्के रुग्णांमध्ये ही औषधी कायमची थांबवावी लागली. म्हणून, रुग्णांनी या दुष्परिणामांबद्दल जागरूक असणे आणि कोणतीही लक्षणे, विशेषत: हात किंवा पाय यांना मुंग्या येणे किंवा जळजळ होणे ही लक्षणे दिसून येताच तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

-टीबी उपचारांमध्ये एक यशस्वी पाऊल

‘साइड इफेक्ट्’ची शक्यता असूनही, नवीन ‘एमडीआर-टीबी’उपचार एक यशस्वी पाऊल आहे. या रुग्णांना राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत महागडी द्वितीय श्रेणीची ‘अँटी-टीबी’ औषधे मोफत मिळतात. चांगले रिझल्ट दिसून येत आहेत.

 

-‘लिनेझोलीड’चा वापर दुष्परिणामाच्या तीव्रतेवर आधारित असावा 

‘लिनेझोलीड’औषधाचा वापर हा दुष्परिणामाच्या तीव्रतेवर आधारित असावा. यामुळे लवकर लक्षणे ओळखणे व उपचार महत्त्वाचा ठरतो. गंभीर दुष्परिणामाच्या प्रकरणांमध्ये तात्काळ ही औषधी बंद करणे आवश्यक असते. या लक्षणांची माहिती रुग्णांना देणे गरजेचे आहे.

-डॉ. ग्यानशंकर मिश्रा, सहयोगी प्राध्यापक श्वसनरोग विभाग, मेयो

Web Title: Tingling in the hands and feet is a side effect of the medicine; Consult a doctor as soon as symptoms appear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य