टिप्परने सायकलस्वारास चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:09 AM2021-09-26T04:09:54+5:302021-09-26T04:09:54+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क खापरखेडा : समाेर असलेला ऑटाे मागे येत असल्याने सायकलस्वार गाेंधळला. त्यातच ताे मागून वेगात आलेल्या टिप्परच्या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा : समाेर असलेला ऑटाे मागे येत असल्याने सायकलस्वार गाेंधळला. त्यातच ताे मागून वेगात आलेल्या टिप्परच्या डाव्या भागाच्या मागच्या चाकाखाली आल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघात हाेताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली हाेती. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) परिसरातील अण्णामाेड ते चनकापूर राेडवर शनिवारी (दि. २५) सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली.
बिहारी थगई राजभर (६९, रा. मिलन चाैक, चनकापूर, ता. सावनेर) असे मृताचे नाव आहे. बिहारी राजभर सायकलने त्यांच्या घराच्या दिशेने जात हाेते. त्यातच समाेर असलेला ऑटाे मागे (रिव्हर्स) येत हाेता. त्यामुळे ते गाेंधळले आणि खाली काेसळले. त्यातच मागून येत असलेल्या काेळसा घेऊन जाणाऱ्या एमएच-३४/एव्ही-०९७४ क्रमांकाच्या टिप्परच्या मागच्या चाकाखाली आल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हा टिप्पर डिझेल घेण्यासाठी अण्णामाेड, खापरखेडा येथील पेट्राेलपंपाच्या दिशेने जात हाेता.
अपघात हाेताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली हाेती. बिहारी राजभर वेकाेलिच्या काेळसा खाणीत नाेकरीला हाेता. सन २०१६ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर ते पत्नीसाेबत चनकापूर येथे राहायचे. त्यांना दाेन मुली व दाेन मुले आहेत. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून नागरिकांना बाजूला करीत मृतदेह ताब्यात घेतला व उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी टिप्परचालक सय्यद फकरुद्दीन झादा (५९, रा. छिंदवाडा, मध्य प्रदेश) याच्या विराेधात गुन्हा नाेंदविला आहे. या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक राजेश पिसे करीत आहेत.
...
शरीराचे अक्षरश: तुकडे
या अपघातात बिहारी राजभर यांच्या शरीराचे अक्षरश: तुकडे झाले हाेते व ते टिप्परच्या चाकात फसले व चिकटले हाेते. ते काढण्यासाठी पंचायत समिती सदस्य राहुल तिवारी, सरपंच पवन धुर्वे यांच्यासह तरुणांनी पाेलिसांना मदत केली. अण्णामाेड-चनकापूर मार्गावर ठिकठिकाणी खड्डे तयार झाले आहेत. या मार्गालगत माेठ्या प्रमाणात वाहने उभी केली जात असल्याने या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे.