नोटा फाडणे हा देशद्रोह; किरीट सोमय्यांच्या वर्तनावर दिवाकर रावतेंचा आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:48 AM2018-05-24T00:48:30+5:302018-05-24T00:48:30+5:30

 एका बाजूला भाजपाची कूटनीती आहे तर दुसºया बाजूला बेधडक शिवसैनिक आहे.

Tipping of notes is treason; Diwakar Rawat's objection on the behavior of Kirit Soumi | नोटा फाडणे हा देशद्रोह; किरीट सोमय्यांच्या वर्तनावर दिवाकर रावतेंचा आक्षेप

नोटा फाडणे हा देशद्रोह; किरीट सोमय्यांच्या वर्तनावर दिवाकर रावतेंचा आक्षेप

Next

भाजपाचे मुंबईतील खासदार किरीट सोमय्या यांनी हातगाडी चालविणाऱ्याच्या जवळील नोटा घेऊन फाडल्या. यावर रावते म्हणाले, खासदाराने नोटा फाडणे यावर केंद्रीय अर्थमंत्री व रिझर्व्ह बँकेचे प्रमुख काय मत देतात ते महत्त्वाचे आहे. नोटांवर देश चालतो, ही राष्ट्रीय मुुद्रा आहे. त्यामुळो नोटा फाडणे हा राजद्रोह आहे का, असेल तर काय शिक्षा व्हावी, यावर विचार व्हावा.
 एका बाजूला भाजपाची कूटनीती आहे तर दुसºया बाजूला बेधडक शिवसैनिक आहे. त्यामुळे कुणाचीही चिंता वाटत नाही. शिवसेना स्वबळावर विदर्भातील सर्व ६२ जागा लढविणार असून चांगले यशही मिळवून दाखवेल, असा विश्वास शिवसेनेचे संपर्क प्रमुख व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी व्यक्त केला.
विदर्भातील पक्षसंघटनेचा आढावा घेण्यासाठी रावते हे बुधवारी नागपुरात दाखल झाले. त्यांनी भंडारा- गोंदिया व नागपूर अशा तीन जिल्ह्यांचा आढावा घेतला. बैठकीनंतर पत्रकारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निरंजन डावखरे यांनी भाजपात प्रवेश केल्याकडे लक्ष वेधले असता रावते म्हणाले, भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष आहे. इतर पक्षातून माणसे घेऊन निवडणुका लढवायचे काम भाजप करीत आहे. आयातीवरच पक्ष चालणार असेल तर एक दिवस ते त्यांना चांगलेच महागात पडेल. लोकशाही व घटनेचा सन्मान करणाºया पक्षाचा जनता सन्मान करते. हे कर्नाटकने दाखवून दिले आहे.
शिवसेनेने भाजपाची साथ सोडली तर शिवसेनेचे आमदार फुटतील, या रामदास आठवले यांनी केलेल्या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतला. आठवले विनोद करतात, हे माहीत आहे. ते एवढा राष्ट्रीय विनोद करतील हे माहीत नव्हते, अशा शब्दात त्यांनी खिल्ली उडविली.

Web Title: Tipping of notes is treason; Diwakar Rawat's objection on the behavior of Kirit Soumi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.