विमान दुरुस्तीचा मोठा हब बनणार; एएआर-इंदमार १५ एकरात सहा अतिरिक्त हँगर तयार करणार

By मोरेश्वर मानापुरे | Published: June 23, 2024 10:28 PM2024-06-23T22:28:58+5:302024-06-23T22:29:58+5:30

नागपुरातील एएआर-इंदमार अतिरिक्त हँगर तयार करीत आहे. 

to become a major hub for aircraft repair aar indmar will build six additional hangars on 15 acres | विमान दुरुस्तीचा मोठा हब बनणार; एएआर-इंदमार १५ एकरात सहा अतिरिक्त हँगर तयार करणार

विमान दुरुस्तीचा मोठा हब बनणार; एएआर-इंदमार १५ एकरात सहा अतिरिक्त हँगर तयार करणार

मोरेश्वर मानापुरे, नागपूर : विमान दुरुस्ती आणि देखभाल क्षेत्रात वाढत्या घडामोडींमुळे नागपूर विमानांसाठी दुरुस्ती व देखभालचे मोठे हब बनण्याची शक्यता आहे. येथील एमआरओ कंपन्या विस्तार करीत आहे. नागपुरातील एएआर-इंदमार अतिरिक्त हँगर तयार करीत आहे. 

एएआर-इंदमार व एअर इंडियाने एमआरओमध्ये १०० विमानांची दुरुस्ती केली आहे. एअर इंडिया एमआरओने कुवैत विमान कंपनीच्या विमानांची दुरुस्ती करीत आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप सोडली आहे. इंदमारने नवीन हँगरमध्ये छोट्या विमानाच्या दुरुस्तीची तयारी चालविली आहे. एअर इंडियाने ५०० नवीन विमानाचे ऑर्डर दिले आहेत. इंडिगोकडे ३५० विमाने असून ३०० विमान खरेदीचे ऑर्डर दिले आहेत. अकासा आणि स्टार एअर या विमान कंपन्या नवीन शहरांमध्ये विमानसेवा सुरू करणार आहेत. छोट्या विमानांचीही मागणी वाढत आहे. त्यामुळे एरोनॉटिक इंजिनिअर्ससाठी मोठी संधी आहे. 

देशात विमानांची संख्या वाढल्याने नवीन एमआरओ तयार होत आहेत. हेवस एरोटेक कंपनी गुडगाव, बेंगळुरू व दिल्लीतील एमआरओमध्ये विमानांची दुरुस्ती करीत आहे. कंपनीचे एमडी अंशुल भार्गव म्हणाले, मुंबईत नवीन एमआरओ सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर हैदराबाद, कोलकाता व चेन्नईमध्ये सुरू होईल. आम्ही सेफरॉनचे भागीदार आहोत.

एएआर-इंदमार एमआरओ सध्या एअरबस-३२० व्यतिरिक्त इतर विमाने आणि छोट्या विमानांची दुरुस्ती व देखभाल करते. भविष्यातील गरजा पाहता १५ एकरात ६ नवीन हँगर तयार करेल. - योगेंद्र कुमार, उपाध्यक्ष, एएआर-इंदमार.

Web Title: to become a major hub for aircraft repair aar indmar will build six additional hangars on 15 acres

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.