मेयोमध्ये आता तंबाखू बंदी, २०० रुपये दंड
By सुमेध वाघमार | Published: May 21, 2024 06:06 PM2024-05-21T18:06:59+5:302024-05-21T18:07:25+5:30
७ हजारांचे पकडले तंबाखूजन्य पदार्थ : पिचकाºयांनी ५४ कोटींच्या इमारतीची दुर्दशा
नागपूर : मेयोने जवळपास ५४ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या २५० खाटांच्या सर्जिकल कॉम्प्लेक्स इमारतीसह परिसर खर्रा व पानाच्या पिचकाºयांनी रंगून गेल्या आहेत. घाणेरड्या वृत्तीच्या या लोकांवर कारवाई कधी?, असा प्रश्न उपस्थित केला जात असताना अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण यांनी पुढाकार घेऊन प्रवेशद्वारावरच नातेवाईकांची तपासणी मोहिमेला सुरूवात केली, परिणामी, मंगळवारी पहिल्याच दिवशी ७ हजारांवर लोकांकडून खर्रासह तंबाखूजन्य पदार्थ गोळा केले. रुग्णालयाच्या आत तंबाखू बंदी घालण्यात आली असून थुंकणाºयावर २०० रुपये दंड आकारण्याचे आदेशही त्यांनी दिले.
गरीबच नाही तर सामान्यांसाठी आधार ठरलेल्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) रुग्णांची संख्या वाढत आहे. शस्त्रक्रियेचा स्वतंत्र विभाग उभारण्यासाठी २५० खाटांचे सर्जिकल कॉम्प्लेक्सचे बांधकाम करण्यात आले. मात्र, इमारत रुग्णसेवेत सुरू होत नाही तोच रुग्ण, नातेवाईक व रुग्णालयातील कर्मचारी सवयीनुसार कचरापेटीत कचरा न टाकता खिडकीतून बाहेर टाकणे सुरू केले. खºया व पानाचा पिचकाºयाने भिंती लाल होऊ लागल्या. रुग्णालयात सुरक्षा रक्षक असतानाही ते स्वत:च यात सहभागी होत असल्याने चकाचक इमारत घाण करण्याची येथे स्पर्धा लागल्याचे किळसवाणे चित्र निर्माण झाले. ‘लोकमत’ने या संदर्भात वेळोवेळी वृत्त प्रकाशित केले. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात थुंकणाºयांवर कारवाई व्हायची. परंतु पुन्हा दुसºया दिवशी ‘जैसे थे’ स्थिती व्हायची. आता डॉ. चव्हाण यांच्याकडे अधिष्ठातापदाची जबाबदारी आल्याने त्यांनी सफाईकामाकडे विशेष लक्ष दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘सर्जरी कॉम्प्लेक्स’मध्ये प्रवेश घेणाºया प्रत्येकाची झाडाझडती घेण्याचे आदेश दिले. यात पान, खर्रा, तंबाखू खाऊन येणाºयांवर किंवा सोबत नेणाºयांना प्रवेश देऊ नका अशा सूचना सुरक्षा रक्षकांना दिले. रुग्णालयात थुंकणाºयांकडून १०० ते २०० रुपये आकारा त्यासाठी पथक तयार करा, असेही त्यांनी सांगितले.
सुरक्षा रक्षकांनी दाखविले बळ
मेयो रुग्णालयाचा परिसर हा वसाहती लागून आहे. मुख्य प्रवेशद्वारातून कोणीही ये-जा करू शकत असल्याने समाजविघातकांचा सुळसुळाट वाढला आहे. त्यांना वचक बसावा यासाठी मंगळवारी सकाळी महाराष्टÑ सुरक्षा बलाचा (एमएसएफ) विदर्भाचे सहसंचालक जयदेव आखरे यांच्या मार्गदर्शनात रुग्णालयाचा परिसरात परेड करण्यात आली. यावेळी २६६वर जवान सहभागी झाले होते. आखरे यांनी जवानांचे फिजीकल फिटनेससह त्यांचे कर्तव्य, युनिफार्म आदी विषयी मार्गदर्शन केले.
रुग्णालयात थुंकणाºयांवर कारवाई
सर्जीकल कॉम्प्लेक्सच नाही तर संपूर्ण रुग्णालयाच्या स्वच्छतेसाठी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांना बंदी घातली आहे. सुरक्षा रक्षकांना प्रवेशद्वारावरच नातेवाइकांची तपासणी करून खर्रासह तंबाखूजन्य पदार्थ ताब्यात घेण्याचा सूचना दिल्या आहेत. रुग्णालयात थुंकताना कोणी आढळल्यास दंडात्मक कारवाईचे अधिकारही रक्षकांना दिले आहे.
- डॉ. रवी चव्हाण, अधिष्ठाता, मेयो