तंबाखूमुळे सहा सेकंदात एकाचा मृत्यू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 11:53 PM2018-11-06T23:53:54+5:302018-11-06T23:58:34+5:30
तंबाखूतील घातक रसायने ‘हेड अॅण्ड नेक कॅन्सर’साठी ८५ टक्के जबाबदार आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार प्रत्येक सहा सेकंदमध्ये एका व्यक्तीचा तंबाखूमुळे मृत्यू होतो. यामुळे तंबाखूचे व्यसन वेळीच थांबवा, असे आवाहन कॅन्सर रोग तज्ज्ञांनी केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तंबाखूतील घातक रसायने ‘हेड अॅण्ड नेक कॅन्सर’साठी ८५ टक्के जबाबदार आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार प्रत्येक सहा सेकंदमध्ये एका व्यक्तीचा तंबाखूमुळे मृत्यू होतो. यामुळे तंबाखूचे व्यसन वेळीच थांबवा, असे आवाहन कॅन्सर रोग तज्ज्ञांनी केले आहे.
७ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाच्या पूर्वसंध्येला कॅन्सररोग तज्ज्ञ डॉ. सुशील मानधनिया यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले, तंबाखूमुळे वर्षभरात सुमारे ६० लाख लोकांचा मृत्यू होतो. २०३० पर्यंत मृत्यूचा आकडा दरवर्षी आठ दशलक्षपर्यंत जाण्याची भीती आहे. भारतात सात टक्के मृत्यू तंबाखूमुळे होतात. जे ३० वर्षीय आणि त्यापेक्षा जास्त वयोगटातील असतात. तंबाखूमध्ये जवळपास २८ हानीकारक रसायने असतात. ज्यामुळे डोके आणि मानेचा कॅन्सर होऊ शकतो. सिगारेट न ओढणाऱ्यांच्या तुलनेत ओढणाऱ्यांमध्ये हा कॅन्सर होण्याची शक्यता १० टक्के जास्त असते. ‘हेड अॅण्ड नेक’ कॅन्सरमुळे श्वास घेणे, खाणे, बोलणे आणि तुम्ही कसे दिसता? हेसुद्धा नेहमीकरता बदलवू शकतो. भारतात ‘हेड अॅण्ड नेक’ हा तिसरा सामान्य कॅन्सर आहे. सहावा सामान्य कॅन्सर पुरुषांमध्ये, तर सातवा महिलांमध्ये आढळतो. कॅन्सरचे मुख्य कारण तंबाखू, लायीम, बिटेल आणि धुम्रपानाचे मौखिक सेवन हे आहे. भारतात चुना,पान व सिगारेट खूप प्रचलित असून, यामुळेच डोकं व मानेचा कॅन्सर होतो. तंबाखू खाण्याने कॅन्सर होतो. याशिवाय हृदय, फुफ्फुसे, टीबी, रक्तदाब आदींवरही परिणाम होतो. गरोदर मातेच्या मुलावरही परिणाम होतो. त्यामुळे तंबाखूपासून दूर राहणेच चांगले, असा सल्लाही डॉ. मानधनिया यांनी दिला आहे.