सुरक्षा यंत्रणेकडून तंबाखूजन्य पदार्थ जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 11:15 PM2018-07-05T23:15:25+5:302018-07-05T23:15:55+5:30
विधिमंडळाच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन होऊ नये म्हणून विधान भवनाच्या सुरक्षा यंत्रणेने गुरुवारी अचानक प्रत्येक व्यक्तीच्या खिशांची तपासणी केली. यात अनेकांजवळ तंबाखू, खर्रा आढळून आला. सुरक्षा यंत्रणेने हे सर्व जप्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधिमंडळाच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन होऊ नये म्हणून विधान भवनाच्या सुरक्षा यंत्रणेने गुरुवारी अचानक प्रत्येक व्यक्तीच्या खिशांची तपासणी केली. यात अनेकांजवळ तंबाखू, खर्रा आढळून आला. सुरक्षा यंत्रणेने हे सर्व जप्त केले.
राज्यात तंबाखूजन्य पदार्थावर अनेक वर्षांपासून प्रतिबंध आहे. त्यामुळे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी सुरक्षा यंत्रणेने परिसरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या खिशाची प्रवेशद्वारावर तपासणी सुरू केली. याप्रसंगी सुमारे ५० हून अधिक व्यक्तींकडे तंबाखूच्या पॅकेट व खर्रा आढळला. सुरक्षा यंत्रणेने हे सर्व जप्त केले. प्रवेश द्वारावर खर्रा जप्त होत असल्याचे बघत, खर्रा शौकिनांमध्ये घबराहट पसरली. सभागृहाच्या बाहेर असलेल्यांना ही माहिती कळताच त्यांनी त्यांच्या वाहनात खर्रा ठेवूनच आत येणे पसंत केले. दरम्यान उपराजधानीतील शासकीय दंत महाविद्याालय व रुग्णालयासह विविध संस्थेच्या अहवालात तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाने कर्करोग होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचा आधार घेत शासनाने राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून गुटखा, पानमसालासह सुगंधित तंबाखूजन्य पदार्थाच्या खरेदी- विक्रीवर बंदी घातली आहे. अन्न व प्रशासन विभागाकडून अधूनमधून या खऱ्र्यावर कारवाई केली जाते. परंतु त्यानंतरही विदर्भात सर्वाधिक खऱ्र्याची विक्री होते.