जीएसटीविरोधात आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:10 AM2021-02-26T04:10:19+5:302021-02-26T04:10:19+5:30
नागपूर : वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) जाचक तरतुदींने देशभरातील व्यापारी त्रस्त आहे. व्यापाऱ्यांच्या हितासाठी आणि जाचक तरतुदी हटविण्याच्या ...
नागपूर : वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) जाचक तरतुदींने देशभरातील व्यापारी त्रस्त आहे. व्यापाऱ्यांच्या हितासाठी आणि जाचक तरतुदी हटविण्याच्या मागणीसाठी कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या (कॅट) आवाहनार्थ नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे (एनव्हीसीसी) शुक्रवार, २६ रोजी व्यापार बंद आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनात व्यापारी, वाहतूकदार आणि कर संबंधित व्यावसायिक सहभागी होणार आहे. आंदोलनादरम्यान देशभरातील ८ कोटींपेक्षा जास्त किरकोळ व्यापारी जीएसटी प्रक्रिया सरळसोपी करण्याची मागणी सरकारसमोर करणार आहेत. चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज अॅण्ड ट्रेडचे (कॅमिट) अध्यक्ष दीपेन अग्रवाल म्हणाले, जीएसटी प्रक्रिया सरळसोपी करण्याची कॅमिटची मागणी आहे. पण महाराष्ट्रात कोविड संक्रमण वाढल्याने आणि वीकेंड लॉकडाऊन लावण्यात आल्याने सामान्य जनतेच्या सुविधेसाठी व्यापाऱ्यांनी काळी फित लावून दुकाने सुरू ठेवावीत. ज्यांना बंदमध्ये सहभागी व्हायचे असेल त्यांना दुकाने बंद ठेवता येईल.