आज अन्नदात्यासाठी अन्नत्याग

By admin | Published: March 19, 2017 02:56 AM2017-03-19T02:56:40+5:302017-03-19T02:56:40+5:30

यवतमाळ जिल्ह्यातील साहेबराव करपे या शेतकऱ्याच्या आत्महत्येला उद्या १९ मार्च रोजी...

Today, food for food | आज अन्नदात्यासाठी अन्नत्याग

आज अन्नदात्यासाठी अन्नत्याग

Next

भूमिपुत्रांनो मोठ्या संख्येने सहभागी व्हा
नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील साहेबराव करपे या शेतकऱ्याच्या आत्महत्येला उद्या १९ मार्च रोजी ३१ वर्षे पूर्ण होत आहे. त्या दुर्दैवी घटनेच्या स्मृतिप्रीत्यर्थ उद्या राज्यभरात एक दिवसाचे अन्नत्याग (उपवास) आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, नागपुरातील विविध संघटनांनी पुढाकार घेतला आहे. यात ‘जनमंच’ संस्थेतर्फे नागपुरात महाराज बाग चौकातील डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्यासमोर सकाळी १० ते दुपारी ३ वाजता दरम्यान आंदोलन केले जाणार आहे. याशिवाय यवतमाळ, मूर्तिजापूर आणि काटोल येथे आंदोलन होणार असल्याची माहिती जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड़ अनिल किलोर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. अन्नदात्यासाठी करण्यात येणाऱ्या या आंदोलनात भूमिपुत्रांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे त्यांनी आवाहन केले आहे. ‘जनमंच’ सोबतच विदर्भ राज्य आघाडीतर्फेसुद्धा शहरातील संविधान चौकात सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजता दरम्यान अन्नत्याग व धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. आजपर्यंत विदर्भातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम, व यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल १ लाख ३६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या करू न आपली जीवनयात्रा संपविली आहे. त्यांच्या स्मृतीत हे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाचा शेतकरी नेते अमर हबीब यांनी सर्व प्रथम बिगुल फुंकला. त्यानंतर या आंदोलनास राज्यभरातून प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळू लागला आहे.
उद्या १९ मार्च रोजी राज्यभरात गावोगावी ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग’ केला जाणार आहे. सातेफळ गावांत काळ्या ठिपक्यांची रांगोळी काढून त्या घटनेचा निषेध नोंदविला जाणार आहे. तसेच चील गव्हाण या गावात उद्या एकाही घरी चुल पेटणार नाही.(प्रतिनिधी)

Web Title: Today, food for food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.